घरमुंबईलोकसभा निवडणूक : दक्षिण मुंबईत ९० लाखांची रोकड जप्त!

लोकसभा निवडणूक : दक्षिण मुंबईत ९० लाखांची रोकड जप्त!

Subscribe

मुंबईतून आचारसंहितेमध्ये ९० लाखांची रोकड तप्त करण्यात आली असल्यामुळे खळबळ उडाली आहे.

एकीकडे लोकसभा निवडणुकांचा प्रचार मुंबईत जोरदार सुरू असतानाच निवडणुकांदरम्यान होणाऱ्या पैशांच्या व्यवहाराची प्रकरणंही समोर येऊ लागली आहेत. सोमवारी मुंबईत आयकर विभाग आणि निवडणूक आयोग पथकाने दोन वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत एकूण ९० लाखांची रोकड जप्त केली आहे. ही रोकड मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघातून हस्तगत करण्यात आली असून इथे शिवसेनेचे विद्यमान खासदार अरविंद सावंच आणि काँग्रेसचे मिलिंद देवरा या उमेदवारांमध्ये थेट लढत आहे. हा पैसा निवडणुकांसंदर्भातच हस्तांतरित होत असल्याचा संशय पोलिसांना आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Mumbai South Loksabha Constituency,Shivsena MP Arvind Sawan
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ

झवेरी बाजारमध्ये पहिली कारवाई

शनिवारी आयकर विभागाच्या चौकशी पथकाने दक्षिण मुंबईतल्या झवेरी बाजारमध्ये केलेल्या कारवाईत ४० लाखांची रोकड जप्त केली. तियुश कावेडिया या कमिशनवर कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या व्यापाऱ्यावर केलेल्या कारवाईत ही रक्कम हस्तगत केली आहे.

- Advertisement -

लॅण्डरोव्हर कारमधून ५० लाख जप्त

तर दुसऱ्या कारवाईत, निवडणूक आयोगाच्या फिरत्या तपासणी पथकाने ५० लाखांची रक्कम जप्त केली आहे. शनिवारी १३ एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ताडदेव परिसरात पारसी अग्यारी जवळ हे पथक तपासणी करत होतं. यावेळी पाहणी करत असताना लाल रंगाच्या लॅन्ड रोव्हर (डिस्कवरी) कारची (एम.एच.०१ सी.एच.०७०७) त्यांनी तपासणी केली. त्यात प्रशांत रमेशचंद्र समदानी नावाच्या व्यक्तीकडे ५० लाख रुपये रक्कम असल्याचं आढळून आलं.


व्हिडिओ – गिरणी कामगारांनी भरले मिलिंद देवरांचे डिपॉझिट!

दोन्ही प्रकरणांबाबत आयकर विभागामार्फत अधिक तपास सुरु असल्याची माहिती मुंबई दक्षिण लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी बन्सी गवळी यांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -