घरमुंबईबॉलिवूडमधील प्रसिद्ध खलनायक महेश आनंद यांचे निधन

बॉलिवूडमधील प्रसिद्ध खलनायक महेश आनंद यांचे निधन

Subscribe

बॉलिवूडमधील सुप्रसिध्द खलनायक महेश आनंद यांचे आज निधन झाले आहे. शहंशाह, मजबूर, स्वर्ग, थानेदार, विश्वात्मा, गुमराह, खुद्दार, बेताज बादशाह, विजेता आणि कुरुक्षेत्र यांसारख्या चित्रपटांमध्ये महेश आनंद यांनी काम केले होते.

बॉलिवूडच्या ८० आणि ९० च्या दशकात अनेक चित्रपटांमध्ये खलनायक म्हणून प्रसिध्दीस आलेला अभिनेता महेश आनंद यांचे आज निधन झाले आहे. वयाच्या ५७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नुकतेच त्यांनी ‘रंगीला राजा’ या गोविंदाच्या चित्रपटातून पुन्हा कमबॅक केले होते. १९८० ते १९९० मधील अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यांनी खलनायकाची भूमिका वठवली होती.

महेश आनंद बॉलिवूडमधील प्रसिध्द चेहऱ्यांमधील एक चेहरा होते. शहंशाह, मजबूर, स्वर्ग, थानेदार, विश्वात्मा, गुमराह, खुद्दार, बेताज बादशाह, विजेता आणि कुरुक्षेत्र यांसारख्या चित्रपटांमध्ये महेश आनंद यांनी काम केले होते. कमीत-कमी अठरा वर्षांनी त्यांनी ‘रंगीला राजा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पुन्हा प्रवेश केला होता. पहलाज निहलानीसोबत त्यांचा हा तिसरा चित्रपट होता. याआधी अंदाज आणि आग का गोला या चित्रपटात त्यांनी एकत्र काम केले होते.

- Advertisement -

काही दिवसांपुर्वी महेश आनंद यांना आपल्या चाहत्यांसाठी फेसबूवर पोस्ट देखील केली होती. ते म्हणाले, “मी अठरा वर्षांनी बॉलिवूडमध्ये कमबॅक केला आहे, आशा करतो तुम्ही त्याला चांगला प्रदिसाद द्याल.” त्यांच्या आधिच्या पत्नी म्हणजेच उषा बचनाई यांनाही त्यांचा मृत्यू झाला, याची कल्पना नव्हती. गेले १७ वर्ष आम्ही एकमेकांसोबत संपर्कात नसल्याचे त्यानी सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -