घरमुंबईवडाळ्यात १३ वर्षाच्या मुलाची १८ व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या

वडाळ्यात १३ वर्षाच्या मुलाची १८ व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या

Subscribe

वडाळ्यातील आयमॅक्स थिएटर जवळील गिरनार टॉवरच्या १८ व्या मजल्यावरून १३ वर्षाच्या मुलाने उडी मारून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली.

वडाळ्यातील आयमॅक्स थिएटर जवळील गिरनार टॉवरच्या १८ व्या मजल्यावरून १३ वर्षाच्या मुलाने उडी मारून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. वडाळा ट्रक टर्मिनस पोलीस ठाण्यात या मृत्यूबाबत नोंद करण्यात आली असून आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकलेले नाही.

एकुलता एक रियान

रियान चतुर्वेदी असे या मुलाचे नाव असून तो सांताक्रूझ येथील पोद्दार शाळेत आठवी इयत्तेत शिकत होता. आई वडिलांसह वडाळा भक्ती पार्क येथील आयनॉक्स थिएटर येथे असलेल्या गिरनार टॉवर या इमारतीच्या १६ व्या मजल्यावरील बी विंगमध्ये राहत होता. रियानचे वडील प्रबळ हे शेअर बाजारात काम करतात, तर आई सोमा बँकेत नोकरीला आहे. रियान हा चतुर्वेदी दाम्पत्याचा एकुलता एक मुलगा होता. गुरुवारी आई-वडील हे दोघेही कामावर गेले होते. रियान हा दुपारी नेहमीप्रमाने शेजारीच्या काकींकडे जेवण करून घरी आला. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास इमारतीच्या आवारात खाली काही तरी पडण्याचा आवाज झाल्याने इमारतीच्या वॉचमनने आवाजाच्या दिशेने धाव घेतली असता रियान हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला. काही वेळाने घटनास्थळी दाखल झालेल्या वडाळा टीटी पोलिसांनी जखमी रियानला उपचारासाठी सायन रुग्णालयात येथे आणण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.

- Advertisement -

१८ व्या मजल्यावरून मारली उडी 

पोलिसांनी इमारतीच्या गच्चीवर जाऊन बघितले असता रियान याची चप्पल गच्चीवर मिळून आली, तसेच जवळपास काही संशयास्पद मिळून आलेले नाही. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, रियान हा दुपारी शाळेतून घरी आल्यानंतर त्याने दुपारचे जेवण घेतले त्यानंतर बऱ्याच वेळाने त्याने १८ व्या मजल्यावरील गच्चीवर जाऊन चप्पल काढून गच्चीच्या कठड्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली असावी, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. रियान हा मोबाईल फोन वापरत नव्हता, त्यामुळे आत्महत्येपूर्वी त्याचे आईवडिलांशी काहीच बोलणे झालेले नसल्याचे प्राथमिक तपासावरून कळून येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. वडाळा ट्रक टर्मिनस पोलीस रियानच्या आत्महत्येप्रकरणी अपमृत्यूची नोंद घेतली असून आत्महत्येचे कारण कळू शकलेले नाही. याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा –

नाशिक : पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या

- Advertisement -

तब्बल ४८ वर्षांपूर्वीच्या आठवणींचा भरला मेळा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -