घरमुंबईधारावी येथे 23 वर्षांच्या तरुणावर प्राणघातक हल्ला

धारावी येथे 23 वर्षांच्या तरुणावर प्राणघातक हल्ला

Subscribe

धारावी येथे शैलेशकुमार हजारीलाल वैश्य या 23 वर्षांच्या तरुणावर चारजणांच्या एका टोळीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना शुक्रवारी घडली. याप्रकरणी गंभीर दुखापतीसह जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी चौघांविरुद्ध धारावी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. अमृत बसवराज आसनली, अविनाश बसवराज आसनली, जेम्स भास्कर यलागेट्टी आणि स्टॅनली ऊर्फ माता शान्सुकुमार दोडूमणी अशी या चौघांची नावे आहेत. अटकेनंतर या चौघांनाही वांद्रे येथील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

शैलेशकुमार हा धारावीतील राजीव गांधी नगर, जय भवानी चाळीत राहतो. शुक्रवारी रात्री दहा वाजता तो त्याचा मित्र शाहरुख शेखसोबत राजेश पान टपरीसमोर गप्पा मारत होता. यावेळी तिथे चौघे आरोपी तरुण आले आणि त्यांनी काहीही कारण नसताना शैलेशकुमारसोबत वाद घालण्याचा प्रयत्न केला. तुला जास्त मस्ती आली आहे असे बोलून या चौघांनी त्याला सुरा आणि लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली होती. डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाल्याने शैलेशकुमार हा जखमी झाला होता.

- Advertisement -

या हल्ल्यानंतर ते चौघेही तेथून पळून गेले होते, ही माहिती मिळताच स्थानिक रहिवाशांनी शैलेशकुमारला तातडीने जवळच्या शीव रुग्णालयात दाखल केले, तिथे त्याच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. ही माहिती मिळताच धारावी पोलिसांनी रुग्णालयात जाऊन शैलेशकुमारची जबानी नोंदवून घेतली होती. त्याच्या जबानीवरुन पोलिसांनी गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या चारही आरोपींना धारावी परिसरातून अटक केली. याच गुन्ह्यांत ते चौघेही सध्या पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -