घरमुंबईअमोल कोल्हे 'या' दिवशी करणार मोठी घोषणा; राष्ट्रवादीच्या गोटात चर्चांना उधाण

अमोल कोल्हे ‘या’ दिवशी करणार मोठी घोषणा; राष्ट्रवादीच्या गोटात चर्चांना उधाण

Subscribe

अमोल कोल्हेंच्या या फेसबुक पोस्टमुळे राष्ट्रवादीच्या गोटात मात्र चर्चेला उधाण आलं आहे. दरम्यान अमोल कोल्हे यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी नुकतीच एक फेसबुक पोस्ट केली. त्यानुसार १८ डिसेंबर रोजी ते मोठी घोषणा करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अमोल कोल्हेंच्या या फेसबुक पोस्टमुळे राष्ट्रवादीच्या गोटात मात्र चर्चेला उधाण आलं आहे. दरम्यान अमोल कोल्हे यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

काय म्हणते अमोल कोल्हेंची फेसबुक पोस्ट?

अमोल कोल्हे यांनी काही तासांपूर्वी ही फेसबुक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये बॅकग्राऊंडला भगवा रंग दिसत आहे. तसेच यामध्ये “A Big Announcement……On 18 th December!!!” असे लिहिले आहे.

- Advertisement -

पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव

खासदार अमोल कोल्हे यांच्या या फेसबुक पोस्टवर कमेंट्सचा पाऊस पडत आहे. अमोल कोल्हे कोणती घोषणा करणार? याबाबत अनेकांनी अंदाज वर्तवला आहे. अनेकांनी ही शिवनेरी किल्ल्यासंदर्भात घोषणा होईल, असा अंदाज लावला आहे. तर, बैलगाडा शर्यतीचा मुद्दा निकाली निघाला असेल, असेही काहींना वाटत आहे. तर काहींनी १८ डिसेंबर रोजी शेतकरी कर्जमाफी होईल असा अंदाज वर्तवला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – …तर हे सरकार ५ वर्ष चालेल – अजित पवार

शिवसेनेतून राष्ट्रवादीत

महाविकासआघाडीचे सत्तास्थापनेपूर्वी अमोल कोल्हे म्हणाले होते की, महाशिवआघाडीची आधी अधिकृत घोषणा होऊ दे, मग त्यावर चर्चा करु. कोल्हेंनी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनेला रामराम ठोकून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -