घरमुंबईशाळा परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विकणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

शाळा परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विकणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

Subscribe

शाळा परिसरापासून १०० मीटरच्या अंतरात तंबाखूजन्य पदार्थ विकण्यास बंदी असताना हा कायदा धाब्यावर बसवला जात आहे.

शाळा, महाविद्यालयापासून १०० मीटरच्या अंतरावर तसेच बेकायदेशीरपणे तंबाखूजन्य पदार्थ विकणाऱ्यां विरोधात पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे. त्यानुसार आज ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनांमुळे कल्याणमधील शाळा परिसरांमध्ये तंबाखूजन्य पदार्थ राजरोसपणे विकले जात असल्याने पुन्हा सरकारी कायदा धाब्यावर बसविण्यात आला आहे.

हेही वाचा – अवघ्या सहा महिन्यात उर्मिला मातोंडकरने सोडला काँग्रेसचा ‘हात’

पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करुन तपास सुरु

कल्याण पश्चिम सोनावणे महाविद्यालयाच्या समोर सुनील चौरसिया याने पान टपरी उघडली होती. दुपारी २ वाजण्याच्या सुमारास बाजारपेठ पोलिसांना चौरसिया हा शाळेच्या १०० मीटरच्या अंतरात तंबाखूजन्य पदार्थ विकणे निषिध्द असताना देखील बेकायदेशीरपणे तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करत असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस स्थानकात सुनील चौरसिया विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे. सोमनाथ पुजारी याने मोहिंदर काबुल सिंग शाळेच्या १०० मीटर अंतराच्या आत पान दुकान उघडून बेकायदेशीरपणे तंबाखूजन्य पदार्थ विक्री करत असल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांनी या प्रकरणी सोमनाथ पुजारी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच पारनाका परिसरातील अभिनव विद्या मंदिर परिसरात बाळाराम पवार याने पान टपरी उघडून तंबाखूजन्य पदार्थ विक्री करत असल्यचे निदर्शनास आले. बाजार पेठ पोलीस स्थानकात बाळाराम पवार विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे. कल्याण पश्चिम आंबिवली भास्कर पाटील शाळेपासून १०० मीटर अंतरावरून राजेंद्र झा हा एका हातगाडीवर तंबाखूजन्य पदार्थ विक्री करत असल्याचे निदर्शनास आले. खडकपाडा पोलिसांनी या प्रकरणी राजेंद्र झा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. कल्याण पश्चिम खडकपाडा सर्कल येथील एका दुकानात बेकायदेशीरपणे तंबाखू जन्य पदार्थ विक्री सुरु असल्याचे निदर्शनास आल्याने या प्रकरणी खडकपाडा पोलीस स्थानकात उमाशंकर सिंग या दुकान चालकाविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -