घरमुंबईVideo: मुंबई सेंट्रल येथील कारशेडमध्ये पश्चिम रेल्वेच्या एसी लोकल डब्याला आग

Video: मुंबई सेंट्रल येथील कारशेडमध्ये पश्चिम रेल्वेच्या एसी लोकल डब्याला आग

Subscribe

गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात ही एसी लोकल पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात दाखल करण्यात आली होती.

पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात असणाऱ्या एसी लोकलच्या डब्याला गुरुवारी रात्री कारशेडमध्ये आग लागल्याची घटना समोर आली आहे. ही आग रात्री १ वाजून ४० मिनिटांनी लागली असून ही एसी लोकल मुंबई सेंट्रल येथील कारशेडमध्ये उभी होती. या लोकल ट्रेनला रात्री अचानक आग लागली. अद्याप या आगीचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र, या प्रकारामुळे आज दिवसभर पश्चिम रेल्वेची एसी लोकल ट्रेन सेवा बंद राहणार असल्याचे सांगितले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या एसी लोकच्या एका डब्याला आग लागली आणि अचानक डब्याने पेट घेतल्याने अग्निशामन दलाला घटनास्थळी बोलवण्यात आले. अग्निशमान दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत साधारण पहाटे ३ वाजून ४५ मिनिटांनी ही आग विझवली. दरम्यान, या आगीत डब्यातील वायरिंग आणि इलेक्ट्रॉनिक कॅबिनेट जळून खाक झाले आहे. प्रवासी बसत असलेल्या भागात कोणतेही नुकसान झालेले नाही अशी माहिती मिळतेय.

- Advertisement -

पश्चिम रेल्वेची एसी लोकल सेवा आज बंद

BHEL कंपनीकडून ही ट्रेन तयार करण्यात आलेली ही लोकल ट्रेन गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात ही वातानुकूलित ट्रेन पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात दाखल करण्यात आली होती. या एसी लोकलच्या डब्याला आग लागल्याने आज दिवसभर एसी लोकलची सेवा बंद राहणार असल्याचे सांगितले जात आहे.


वैद्यकीय, अभियांत्रिकी शिक्षण मातृभाषेत शिकवण्याचा निर्णय घेणार – पंतप्रधान मोदी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -