घरमुंबईउल्हासनगरमध्ये भर रस्त्यात चाकूच्या धाकावर गुंडाने लुटले

उल्हासनगरमध्ये भर रस्त्यात चाकूच्या धाकावर गुंडाने लुटले

Subscribe

उल्हासनगरमध्ये भर रस्त्यात एका गुंडाने चाकूच्या धाकावर दोघांना लुटले. या घटनेमुळे उल्हासनगरमधील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

ग्राहकांकडून पैशांची रिकव्हरी करून जात असणाऱ्या दोन जणांना एका इसमाने चॉपरचा धाक दाखवून एकाला मारहाण करीत त्याच्याजवळील २० हजाराची रोख रक्कम जबरीने चोरून नेल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेमुळे उल्हासनगरमधील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

हेही वाचा – लवकरच मुंबईत माझा भाजपप्रवेश होईल – नारायण राणे

अशी घडली घटना

शहरातील कॅम्प नं.२ येथील भैयासाहेब आंबेडकर नगर येथे बलराम बारवसा (२३) हा तरूण राहतो. तो व त्याचा सहकारी राहुल सिन्ना हे दोघे कॅम्प नं.३ येथील इमलीपाडा येथे ग्राहकांकडे रिकव्हरी करण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणाहून पैशाची रिकव्हरी करून ते ईमलीपाडा परिसरातून येत होते. वाटेत सोनू उर्फ डॉन याने त्या दोघांना अडवले. त्यांना चॉपरचा धाक दाखवून बलराम याला ठोशाने मानेवर, गळ्यावर मारहाण करून त्याच्याजवळील रिकव्हरी केलेली २० हजाराची रोख रक्कम जबरीने काढून घेतली. या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात बलराम याने दिलेल्या फिर्यादीवरून सोनू उर्फ डॉन याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक खतीब करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -