घरमुंबईमहापालिकेच्यावतीने पुलांचे निरिक्षण करण्यासाठी एक नवीन 'पद'

महापालिकेच्यावतीने पुलांचे निरिक्षण करण्यासाठी एक नवीन ‘पद’

Subscribe

हिमालय पुलाच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सर्व पुलांचे निरिक्षण करता यावे, यासाठी महापालिकेच्यावतीने प्रमुख पुल निरीक्षक हे पद निर्माण करण्यात येणार आहे. या प्रमुख पुल निरीक्षकामार्फत महापालिकेच्या ताब्यातील सर्व पुलांचे निरीक्षण आणि दुरुस्तीचे कामे करून घेण्यात येणार आहे.

हिमालय पुलाच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सर्व पुलांचे निरिक्षण करता यावे, यासाठी महापालिकेच्यावतीने प्रमुख पुल निरीक्षक हे पद निर्माण करण्यात येणार आहे. या प्रमुख पुल निरीक्षकामार्फत महापालिकेच्या ताब्यातील सर्व पुलांचे निरीक्षण आणि दुरुस्तीचे कामे करून घेण्यात येणार असल्याची माहिती विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मुंबईतील छत्रपती महाराज शिवाजी टर्मिनस येथील हिमालय पादचारी पुल कोसळून झालेल्या दुर्घटनेबाबत आमदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांनी हे निवेदन करत ही माहिती दिली.

८ पुल बंद करण्याची कार्यवाही

हिमालय पुलाचा काही भाग कोसळल्याची घटना १४ मार्च २०१९ रोजी झाली होती. या दुर्घटनेत ७ व्यक्तींचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तर ३३ जण जखमी झाले होते. या दुर्घटनेनंतर पूर्व आणि पश्चिम उपनगरांतील पुलांचा सर्वे करण्यात आला. यामध्ये २९ पुल धोकादायक असल्याचे आढळून आले. या २९ पुलांपैकी ८ पुल पाडण्यात आले तर १३ पुल हे वाहतूक आणि पादचार्‍यांच्या वापराकरता बंद करण्यात आले आहेत. तर उर्वरीत ८ पुल बंद करण्याची कार्यवाही सुरु असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच आतापर्यंत मृत व्यक्तींच्या वारसांना आणि जखमींना मुख्यमंत्री निधी कक्षामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयात रक्कम वर्ग करण्यात आली असून त्यापैकी ३९ लाख एवढी रक्कम संबंधितांना अदा करण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

मुंबईतील २९ वाहतूक आणि पादचारी पूल बंद

मुंबईतील हिमालय पुल दुघर्टनेनंतर शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरातील पुलांचे फेर स्ट्क्चरल ऑडीट करण्यात येत आहे. मात्र, शहर भागातील स्ट्क्चरल ऑडीट करणारी कंपनी डी.डी.देसाई कंपनीला काळ्या यादीत टाकल्यामुळे या जागेसाठी कोणीही कंपनी पुढे येत नव्हती. परंतु आता शहर भागातील परिमंडळ एक आणि दोनसाठी फेर स्ट्क्चरल ऑडीट करण्याची जबाबदारी स्ट्क्टवेल डिझाईनर्स ऍण्ड कन्सल्टंट कंपनीवर सोपवण्यात आली. त्यामुळे शहर भागातील धोकादायक पुलांचे स्ट्क्चरल ऑडीट होवून त्यांच्या दुरुस्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. स्ट्क्चरल ऑडीटसाठी मुंबईतील २९ वाहतूक आणि पादचारी पूल बंद करण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होणार आहे.


वाचा – मुंबईतील नद्यांवरील वाट पुलांअभावी झाली बिकट

- Advertisement -

वाचा – कांदिवली, मालाड, गोरेगावमध्ये पाच पुलांची नव्याने बांधणी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -