घरमुंबईगणेशोत्सवानिमित्त "वक्रतुंड महाकाय" व्हीडिओ भेटीला

गणेशोत्सवानिमित्त “वक्रतुंड महाकाय” व्हीडिओ भेटीला

Subscribe

मनोरंजनाविषयी बातम्या वाचा एका क्लीकवर .....

गणेशोत्सव काही दिवसांवर आला असून यानिमित्ताने सागरीकाने महाराष्ट्राच्या या लाडक्या दैवताचं स्वागत “वक्रतुंड महाकाय” या शब्दात केलं आहे. सागरिका म्युझिकने “वक्रतुंड महाकाय” या खास गाण्याचा व्हीडिओ गणेशोत्सवानिमित्त सोशल मीडियावर नुकताच लाँच केला आहे. या व्हीडिओच दिग्दर्शन सागरिका दास यांनी केले आहे. मराठी संगीत क्षेत्रातील दोन आघाडीचे आणि रसिक प्रेक्षकांचे लाडके कलाकार अवधूत गुप्ते आणि आदर्श शिंदे यांच्या दमदार आवाजात हे गीत संगीतबद्ध करण्यात आलं आहे. या व्हीडिओमध्ये ऋषी सक्सेना आणि रिचा अग्निहोत्री तसेच नवोदित कलाकार निरंजन जोशी यांनी अदाकारी दाखवली आहे. सुहित अभ्यंकर यांनी हे गीत संगीतबद्ध केलं असून पारंपरिक ढोल, ताशा, तुतारी या वाद्यांसोबत गिटारचा सुंदर मिलाफ या गाण्यात प्रेक्षकांना ऐकायला मिळणार आहे. नचिकेत जोग यांनी गाणे लिहिले आहे.


अशी मिळाली एरिकाला प्रेरणाची भूमिका

मुंबई । कसौटी जिंदगी की’ ही लोकप्रिय मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नव्या कलाकारांसोबत ही मालिका छोट्या पडद्यावर येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या मालिकेच्या चित्रीकरणातील अनेक फोटोही व्हायरल होत आहेत. नव्या ‘कसौटी जिंदगी की’मध्ये अभिनेत्री एरिका फर्नांडीस ही प्रेरणाची मध्यवर्ती भूमिका साकारत असून ही भूमिका एरिकाला कशी मिळाली याबाबत एक किस्सा समोर आला आहे. निर्माती एकता कपूर यांनी एरिकाच्या निवडीबाबत सांगितले की, ऑडिशनशिवायच एरिकाला प्रेरणाची भूमिका मिळाली आहे. एकता सांगते, दोन-तीन वर्षांपूर्वी ती कोलकाता येथे व्हेकेशनसाठी आली होती. त्यावेळी ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’ या मालिकेचे प्रोमो पाहिले. त्यानंतर एरिकाबाबत माहिती काढण्यास सांगितली. प्रोमो पाहताच एरिकाला प्रेरणा या व्यक्तीरेखेसाठी साईन करण्याचे निश्चित केले. अशा रितीने कोणतीही ऑडिशन न देता प्रेरणाची भूमिका एरिकाला मिळाली.

- Advertisement -

 दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे हार्मोनियम वादन स्पर्धा

मुंबई । दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने ६ आणि ७ ऑक्टोबर २०१८ या दिवशी सकाळी ९.३० वाजता हार्मोनियम वादन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. पहिल्या दिवशी १० ते १६ वयोगटातील छोटा गट तर दुसर्‍या दिवशी १७ ते २५ वयोगटातील मोठा गट अशी स्पर्धा होईल. हौशी कलाकारांना यात सहभागी होता येईल. आकाशवाणी, दूरदर्शनच्या मान्यताप्राप्त कलाकारांना तसेच व्यावसायिक वादक कलावंताना यात सहभागी होता येणार नाही. स्पर्धेचे प्रवेश अर्ज १० सप्टेंबर २०१८ पासून सकाळी १० ते ६ या वेळेत संस्थेच्या कार्यालयात उपलब्ध होतील. प्रवेश अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख ४ ऑक्टोबर २०१८ ही असणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -