घरमुंबईसर्व विषयांचे आता एकच पुस्तक,दप्तराचे ओझे होणार कमी!

सर्व विषयांचे आता एकच पुस्तक,दप्तराचे ओझे होणार कमी!

Subscribe

पहिली ते सातवी इयत्तेपर्यंत सर्व विषयांचे एकच पुस्तक तयार करण्यात येणार आहे. तीन महिन्यांमध्ये शिकवणे अपेक्षित असलेला अभ्यासक्रम एक किंवा दोन पुस्तकांमध्ये देण्यात येणार आहे. शिक्षण विभागातर्फे हा प्रयोग केला जाणार आहे.

येत्या शैक्षणिक वर्षात प्रायोगिक तत्त्वावर अशी पुस्तके तयार करण्यात येणार आहेत. प्रत्येक विषयाचे स्वतंत्र पुस्तक ठेवण्याऐवजी सर्व विषयांचा समावेश असलेले एकच पुस्तक विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. सुरूवातीला पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी काही जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर हा उपाय अमलात येणार आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शिक्षण विभागातील अधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक घेत विभागाच्या विविध योजनांता आढावा घेण्याबरोबरच एकत्रित पुस्तके तयार करण्याबाबत चर्चा करण्यात आली. द्विभाषिक करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

- Advertisement -

विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे हा विषय सातत्याने चर्चेत असतो. न्यायालयाने या मुद्द्यावरून शिक्षण विभागाला वारंवार फटकारले. मनुष्यबळ विकास मंत्रालयानेही विभागाकडे अहवाल मागितला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -