विविध मागण्यांसाठी शिक्षकांचा मोर्चा

शैक्षणिक समतेसाठी संघर्ष तीव्र करण्याचा निर्धार

Mumbai
शिक्षकांचा मोर्चा

समान काम, समान वेतन, समान पेन्शन सर्वांसाठी! दादर रेल्वे स्टेशन ते परळच्या कामगार मैदानापर्यंत राज्यभरातून आलेल्या शिक्षक, अंगणवाडी ताई, मानसेवी शिक्षक, अंशकालीन संचालक यांचा मोर्चा निघाला. शिक्षण क्षेत्रातील अन्यायाच्या विरोधात आणि समतेच्या मागणीसाठी हा राज्यव्यापी मोर्चा काढण्यात आला होता.

मोर्चाचे नेतृत्त्व आमदार कपिल पाटील, शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे यांनी केले. यावेळी समान काम, समान वेतन, समान पेन्शन, सन्मान याची हमी संविधानामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिली आहे, पण या सरकारला हे मंजूर नाही, अशी टीका आमदार कपिल पाटील यांनी केली. या लबाड सरकारने गेली साडेचार वर्षे शिक्षण क्षेत्रावर अन्यायाचा वरवंटा फिरवला आहे, असेही ते म्हणाले. यावेळी कार्याध्यक्ष सुभाष मोरे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीचे अध्यक्ष नवनाथ गेंड, अंगणवाडी ताईंच्या नेत्या सुनंदा पवार, आदी शिक्षक संघटनांचे पदाधिकारी आणि शिक्षक सहभागी झाले होते.

कपिल पाटील यांच्या मोर्चानंतर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सहाव्या वेतन आयोगाची अधिसूचना २२ एप्रिल २००९ रोजी निघाली आणि शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय १२ जून २००९ ला निघाला. त्यावेळी काँग्रेसची पाटीलकी करणार्‍यांनी मोर्चा सोडा साधे पत्रक पण काढले नाही, अशी टीका केली. यावेळी वित्त आयोगाचे सातव्या वेतन आयोग संदर्भातील अधिसूचना ३१ जानेवारी रोजी प्रसिध्द झाले आणि शिक्षण विभागाकडून आठ दिवसात फाईल वित्त विभागाला पाठविण्यात आली, त्यामुळे आता शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय लवकर निघेल, तरीही मोर्चा का ? राज्य सरकारच्या कर्मचार्‍यांना ज्या दिवशी सातव्या वेतन आयोगाचे पैसे त्यांच्या खात्यात जमा होतील त्याच दिवशी शिक्षकांनाही मिळतील, जे आधी कधी झाले नव्हते असेही तावडे यांनी निर्दशनास आणून दिले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here