घरमुंबईमोबाईलमुळे चोर सापडला

मोबाईलमुळे चोर सापडला

Subscribe

30 तोळे सोने हस्तगत

गेली अनेक वर्षे नेरळसह परिसरातील बेकरे, आंबिवली, भडवळ, उकरूळ, पोशीर, नेरळपाडा आणि अन्य ठिकाणी घरे, दुकाने फोडून चोरी करणार्‍या आरोपीच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. त्याच्याकडून 30 तोळे सोने, रोख रकेमसह हत्यारे जप्त करण्यात आली आहेत. चोरट्याला मोबाईलचा झालेला मोह पोलिसांना त्याच्यापर्यंत घेऊन जाण्यास मदतीचा ठरला.

बेकरे येथील दीनानाथ मालू कराळे यांच्या घरातून 3 नोव्हेंबर रोजी 850 रुपयांची रोख रक्कम चोरून नेण्यात आली होती. त्याच दरम्यान चोरट्याने कराळे यांचा मोबाईल हाताळत असताना त्याचा सेल्फी सेव्ह झाला होता. या अनुषंगाने प्रभारी पोलीस अधिकारी अविनाश पाटील यांनी तपासाची सूत्रे फिरवून पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, पोलीस उप विभागीय अधिकारी अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करून तपासाला सुरुवात केली. तपास सुरू असताना नेरळ-कोल्हारे चारफाटा येथे आरोपीला जेरबंद करण्यात आले. गौतम विलास माने (37) असे त्याचे नाव आहे. आरोपीने ७ ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -