घरमुंबईआगरी कोळीनंतर बेघर आणि प्रकल्पबाधितही नोटाच्या मार्गावर

आगरी कोळीनंतर बेघर आणि प्रकल्पबाधितही नोटाच्या मार्गावर

Subscribe

आगरी कोळी युथ फाउंडेशनने कोणत्याच उमेदवाराला मतदान न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर बेघर आणि प्रकल्पबाधितही नोटाचा मार्ग अवलंबणार आहेत.

लोकसभा निवडणुका अंतिम टप्यात असतांना नकारात्मक मतदारांची संख्या वाढू लागली आहे. लढा देऊनही कामे प्रलंबितच राहिल्याने अनेकांनी नोटाचा इशारा दिला आहे. नुकतेच आगरी कोळी युथ फाउंडेशनने कोणत्याच उमेदवाराला मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे जिल्ह्यातील बेघर आणि शासनाच्या विविध प्रकल्पात पुनर्वसनपासून वंचित राहिलेल्या प्रकल्प बाधित नागरिकांनी एकजूट करत सर्वच उमेदवारांना नोटा वापरण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातून मतदान कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नुकत्याच झालेल्या मतदानात ६५ ते ७० टक्केच्या आत मतदान झाले असून ठाणे जिल्ह्यात ५० टक्केही मतदान होणार नाही, अशी शक्यता निर्माण झाली आहे.

प्रकल्पग्रस्तांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार

नवी मुंबई शहरातील आगरी कोळी बांधवाना आश्वासने देत आतापर्यंत राजकीय नेत्यांनी स्वार्थ साधला असल्याने यावेळी आगरी कोळी समाज आक्रमक झाला आहे. जो पक्ष आमच्या मागण्या पूर्ण करेल त्याच्या पाठीशी आम्ही राहू, असे सांगूनही कोणीच पुढाकार न घेतल्याने शहरातील तब्बल २८ गावांमधील प्रकल्पग्रस्तानी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. नवी मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात हा समाज असून त्याचा थेट परिणाम लोकसभा मतदानावर होणार आहे. ठाणे जिल्ह्यातील बेघर आणि शासनाच्या विविध प्रकल्पात पुनर्वसन पासून वंचित राहिलेल्या प्रकल्प बाधित नागरिकांची एकजूट निर्माण झाली असून त्यांनी स्वतंत्र जाहीरनामा बनवला आहे. नवी मुंबई लोकसभा मतदारसंघात सुमारे लाखो बेघर आणि प्रकल्प बाधित कुटुंब आहेत. या सर्वांनी एक कमिटी तयार केली असून त्या कमिटीच्या माध्यमातून सर्वच राजकीय पक्षांना ते जाहीरनामा देणार आहेत. तो जाहीरनामा राजकीय पक्षांनी त्यांच्या जाहीरनाम्यात समावेश करावा, अशी मागणी करण्यात येणार आहे. तसे न केल्यास लोकसभा निवडणुकीत नोटाचा वापर केला जाईल, असा इशारा प्रकल्पबाधितनी दिला आहे.

- Advertisement -

बेघर आणि प्रकल्पबाधितांची बैठक रविवारी कोपरखैरणे मधील सेक्टर ४ ए गेंडा गार्डन येथे येथे पार पडली. यावेळी महात्मा फुले नगर कोपरखैरणे, असमर्थ नागरिक सेवा भावी सस्था (कल्याण) भटके विमुक्त हक्क परिषद,(कल्याण) आदी संस्थाचे पदाधिकारी उपस्थित होते. झोपडपट्टी पुनर्वसनात शेकडो कुटुंब ही प्रकल्पबाधित आहेत भटके विमुक्त आदिवासी, दलीत आणि मुस्लिम समाजातील अनेक कुटुंबे बेघर आहेत. घर, शिक्षण, रोजगार आणि आरोग्य सेवा आदी मूलभूत अधिकारांपासून वंचित आहेत. याच मुद्यावरून बेघर आणि प्रकल्पबाधित एकत्रित आले असून ठाणे जिल्हा शहर आणि ग्रामीण विकास कृती समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर नोटा पर्यायाचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती कृती समितीचे प्रमुख एलान बर्मावला यांनी दिली आहे. यावेळी महात्मा फुले नगर कोपरखैरणे झोपडपट्टीचे प्रमुख आदित्य गौतम चिकटे सचिव जितेंद्र आनंद बडेकर खजिनदार विकास गायकवाड आदी उपस्थित होते.


वाचा – रायगडमध्ये ‘नोटाला’ जास्त मते पडण्याची शक्यता ?

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -