घरमुंबईआरेच्या आगीला संशयाचा धूर

आरेच्या आगीला संशयाचा धूर

Subscribe

आरेच्या मोकळ्या भूखंडावर अनेकांची नजर आहे, असा आरोप फार आधीपासून पर्यावरणवादी संघटना करत आहेत. हा सगळा 'नो डेव्हलपमेंट झोन' हळूहळू अनेक नव्या उद्योगांसाठी खुला करण्यात येत आहे

काही दिवसांपूर्वी आरे कॉलनीतील जंगलात लागलेली आग ही विझली असली तरी आता या आगीमधून संशयाचा धूर पसरु लागला आहे. आग लागली की लावली गेली? असा संशय आता व्यक्त केला जात आहे. नुकताच अग्निशमनदलाने या आगीचा अहवाल सादर केला आणि ही आग जाणीवपूर्वक लावण्यात आल्याचे स्पष्ट केले. या आधी पर्यावरकरणवादी संघटना आणि स्थानिकांनीदेखील ही आग लावण्यात आल्याचे आरोप केले होते. आता अग्निशमनदलाने  दिलेल्या अहवालाही हेच नमूद केल्यामुळे त्यावर शिक्कामोर्तब झाला आहे.

वाचा- मुंबईच्या गोरेगावातलं आरेचं जंगल पेटलं!

अहवालात नमूद केले ठळक मुद्दे

अग्निशमन दलाच्या अहवालात आरेच्या जंगलातील आगीबाबत काही ठळक मुद्दे अधोरेखित करण्यात आले आहे. आरेच्या जंगलात अनधिकृतरित्या लोकांची ये-जा झाल्याची शक्यता अहवालात वर्तवण्यात आली आहे. शिवाय प्रतिबंधित क्षेत्रात काही माणसांचा संशयास्पद वावर झाल्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेष म्हणजे आग विझल्यानंतर केलेल्या तपासात त्या ठिकाणी अर्धवट जळलेले टायर्स, बाटल्या आणि प्लास्टिक आढळून आले आहे. शिवाय डोंगराला इतकी मोठी आग लागूनही काही ठिकाणी आगीचा कोणताच परिणाम झालेला नाही. या सगळ्या गोष्टी संशय निर्माण करतात, असे अहवालात म्हटले आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाची अधिक चौकशी करावी, असे देखील सुचविण्यात आले आहे.

- Advertisement -
वाचा- गोरेगाव येथील आरे जंगलात भीषण आग

आरेवर नजरेचे काळे ढग

आरेच्या मोकळ्या भूखंडावर अनेकांची नजर आहे, असा आरोप फार आधीपासून पर्यावरणवादी संघटना करत आहेत. हा सगळा ‘नो डेव्हलपमेंट झोन’ हळूहळू अनेक नव्या उद्योगांसाठी खुला करण्यात येत आहे. अनेकदा या ठिकाणी आग लागली आहे. झुडुपे अशा पद्धतीने जाळण्यात आली आहेत की, नंतर पुन्हा त्या ठिकाणी ती उगवू नये हे प्रयत्न विकासक जागा मिळवण्यासाठीच करत असल्याचा आरोप देखील पर्यावरणवाद्यांनी केला आहे. शिवाय सध्या या ठिकाणी मेट्रो २ च्या कारशेडचे कामही सुरु आहे. त्यामुळे देखील या ठिकाणी आग लावली गेली असेल, असा संशयाचा धूर सध्या आरेवर फिरत आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -