सायनमध्ये सामाजिक संदेश देणारी पब्जीची होळी

सायन येथील या पब्जीच्या होळीची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे. ही प्रतिकृती १२ फूटी असून आशिष विठ्ठल कुचेकर आणि अमर विठ्ठल कुचेकर यांनी साकारली आहे.

Mumbai
चला संकल्प करूया पब्जी गेम संपुष्टात आणू या

ब्लू व्हेल, मोमो चॅलेंजनंतर पब्जी या गेमने अनेकांना वेड लावलं आहे. सध्या सर्वत्र पब्जीची क्रेझ पाहायला मिळते आहे. अल्पवयीन मुला-मुलींसह तरुणाई या गेमसाठी अक्षरश: वेडी झाली आहे. या घटनेमुळे पब्जी मोबाईल गेमचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. देशभरातील तरुणांना पब्जी या मोबाईल गेमने वेड लावले आहे. या पूर्वीही पब्जी गेम खेळणाऱ्या अनेक तरुणांनी आत्महत्या केल्याच्या, हल्ले केल्याच्या, वाद विवादाच्या, अपघाताच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.

सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न

या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी सायन कोळीवाडा येथे पब्जीची होळी तयार करण्यात आली आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात येतो. सायन येथील या पब्जीच्या होळीची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे. ही प्रतिकृती १२ फूटी असून आशिष विठ्ठल कुचेकर आणि अमर विठ्ठल कुचेकर यांनी साकारली आहे. येथे देण्यात येणारा संदेश हा पब्जीच्या संबधित आहे. गेल्या एक वर्षापासून लहान मुले व तरुण इतर सर्वांना ह्या पब्जी गेमचा छंद बऱ्यापैकी लागलेला आहे. यामुळे मुलांचे मानसिक संतुलन बिघडत चाल्याचे दिसत आहे. दिवसेंदिवस या गेमच्या नादात कित्येक मुलांनी आपले प्राण गमावले आहे. याचकरिता हा सामाजिक संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न कुचेकर बंधू यांनी यंदाच्या होळीच्या निमित्ताने केला आहे.

पब्जी गेम संपुष्टात आणण्याचा संकल्प

सगळीकडे पब्जी गेमने जगभर थैमान घातले आहे. अँड्रॉईड मोबाईलवर अगदी सहजपणे डाउनलोड होणार्‍या या गेममुळे मुलांचे लक्ष विचलीत होत असल्याचे दिसते. मुलांना पालकांनी काही कामे सांगितली तरीही ते चिडचिड करून त्यास नकार देतात, शिक्षकांच्या शिकवण्याकडे लक्ष देत नाहीत. गेमच्या विरोधात बोलणार्‍या शिक्षकांशी ते उद्धट बोलतात. त्यामुळे पालकांबरोबर शिक्षकांसाठीही आता हा गेम डोकेदुखी ठरत असल्याने सायन येथे पब्जी गेम संपुष्टात आणण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here