खेळणी विकणार्‍या अल्पवयीन मुलीचे अपहरण

अपहरण

उल्हासनगर येथे राहणार्‍या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचे दर्गारोड, अमृतनगर येथून अपहरण झाले. ती वडिलांचा व्यवसाय असलेली खेळणी विकण्यासाठी या भागात आली होती. त्यावेळी अज्ञात आरोपीने तिला फूस लावून पळवून नेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणी या मुलीचे वडील दिनेश कुवारिया यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

या अल्पवयीन मुलीचे नाव सोनल कुवारिया आहे. तिचे छायाचित्र संबंधित ठिकाणी पाठवण्यात आले आहे. अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक आर. एल. शेलार यांनी दिली. तक्रारदार दिनेश कांती कुवारिया (32 रा. सीताराम नगर, लालचक्की, शिवसेना शाखेजवळ, उल्हासनगर ठाणे) यांचा खेळणी विकण्याचा व्यवसाय आहे. रविवारी 10 नोव्हेंबर, 2019 रोजी त्यांची 15 वर्षीय मुलगी सोनल ही दर्गा रोड अमृतनगर, मुंब्रा येथे खेळणी विक्रीसाठी आल्यानंतर तिचे अपहरण झाले आहे. तपास अधिकारी आर. एल. शेले यांनी अपहृत मुलीचे छायाचित्र पोलीस विभागाला वितरित करून प्रसारमाध्यमांकडे पाठविले असूून लवकरच मुलीचा शोध घेण्यात येईल असे सांगितले.