घरमुंबईके.जे.सोमय्या महाविद्यालयाच्या अजब कारभारामुळे १२ विद्यार्थी तणावाखाली

के.जे.सोमय्या महाविद्यालयाच्या अजब कारभारामुळे १२ विद्यार्थी तणावाखाली

Subscribe

दोन महिन्यांनंतर प्रवेश नाकारला

बी.एससी नर्सिंगसाठी ऑफलाईन प्रवेश दिलेल्या 12 विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्याने दोन महिन्यांनंतर के.जे. सोमय्या महाविद्यालयाकडून प्रवेश नाकारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महाविद्यालय सुरू झाल्यानंतर दोन महिन्यांनतर प्रवेश नाकारल्याने विद्यार्थ्यांसमोर प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

के.जे. सोमय्या महाविद्यालयात आम्ही बी.एससी नर्सिंगसाठी अर्ज भरला होते. आमचे नाव प्रतिक्षायादीत होते. पण दोन महिन्यांपूर्वी महाविद्यालयाने आम्हाला फोन करून बोलवले आणि प्रवेश दिला. त्यावेळी महाविद्यालयाने आम्हाला कागदपत्रे व प्रवेश शुल्कापोटी 50 हजार रुपये भरण्यास सांगितले. प्रवेश मिळत असल्याने आम्ही लगेचच पैसे भरून प्रवेश घेतला. आमचे वर्ग सुरू होऊन आता एक महिना झाल्यानंतर ऑक्टोबरच्या सुरुवातीला महाविद्यालयाकडून पालकसभा बोलवण्यात आली. या सभेत त्यांनी आमच्याकडे 30 हजार रुपये मागितले. त्यावेळी अनेकांनी 15 हजार रुपये भरले. त्यांना उर्वरित रक्कम ही महिन्याच्या अखेरीस भरण्यास सांगितली. तसेच त्यावेळी आता पुन्हा ऑनलाईन प्रवेश प्रक्रिय सुरू होत आहे. त्यामुळे तुमचे प्रवेश रद्द करण्यात येतील. पण आम्ही तुम्हाला अन्य महाविद्यालयात खात्रीशीर प्रवेश घेऊन देऊ असे आश्वासन देण्यात आले होते. परंतु आता महाविद्यालयाकडून हात वर करण्यात आल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

गतवर्षी नर्सिंगच्या काही जागा शिल्लक राहिल्याने यावर्षी महाविद्यालयाने प्रथम ऑफलाईन प्रवेश दिले. पण आता सीईटीने ऑनलाईन प्रवेशाची तारीख वाढवल्यवाने महाविद्यालयाकडून ऑफलाईन दिलेले प्रवेश रद्द करण्यात येत आहेत. तसेच विद्यार्थ्यांना जबरदस्ती कागदपत्रे व रकमेचा चेक देऊन त्यांना दुसर्‍या महाविद्यालयात जाण्यास सांगण्यात येत आहे. ऑफलाईन प्रवेश देण्याचा अधिकार महाविद्यालयाला नसताना विद्यार्थ्यांना कसा प्रवेश दिला असा प्रश्न मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य अ‍ॅड. वैभव थोरात यांनी उपस्थित केला. ऑफलाईन प्रवेश दिलेले विद्यार्थी नियमित वर्गामध्ये उपस्थित राहत आहे. त्यांन प्रवेश शुल्कही भरले आहे, त्यांनी कोणत्याही नियमाचे उल्लंघन केले नसतानाही महाविद्यालयाच्या अतातायीपणाचा फटका विद्यार्थ्यांना बसला आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आल्याने ते मानसिक तणावाखाली असून, पुन्हा प्रवेशासाठी त्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे महाविद्यालाने या सर्व विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश द्यावे, अशी मागणी थोरात यांनी केली आहे.

ऑफलाईन प्रवेश देणे चुकीचे आहे. त्यामुळे के.जे. सोमय्या महाविद्यालयाने ऑफलाईन प्रवेश देत 12 विद्यार्थ्यांची फसवणूक केली आहे. त्यांच्या या कृत्याबद्दल त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे
– अ‍ॅड. वैभव थोरात, सिनेट सदस्य

- Advertisement -

संस्था पातळीवर प्रवेश देण्याचे अधिकार महाविद्यालयाला दिले नाहीत. परंतु 15 टक्के प्रवेश संस्था पातळीवर देण्याचे अधिकार त्यांना आहेत. 15 टक्क्यांतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी जर शुल्क भरले नसेल, उपस्थित राहत नसेल किंवा नियमाचे उल्लंघन केले असेल तरच प्रवेश रद्द करण्याचा अधिकार महाविद्यालयाला आहे. परंतु महाविद्यालयाने नियमाचे उल्लंघन केले असेल तर विद्यार्थ्यांनी त्यासंदर्भात प्रवेश नियंत्रक समितीकडे तक्रार दाखल करावी
– प्रवीण शिनगारे, संचालक, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचलनालय

प्रवेशासंदर्भात वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचलनालयकडून येणार्‍या नोटीफिकेशनची आम्ही वाट पाहत आहोत. मी यासंदर्भात तुमच्याही अधिक बोलू शकत नाही. तुम्ही आमच्या पीआरशी बोला
– अवनी ओक, मुख्याध्यापिका, के.जे. सोमय्या महाविद्यालय

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -