घरमुंबईआरक्षणानंतर सार्वजनिक बांधकाम विभागातील नियुक्त्या जाहीर

आरक्षणानंतर सार्वजनिक बांधकाम विभागातील नियुक्त्या जाहीर

Subscribe

राज्य शासनाने सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गाला (एसईबीसी) दिलेल्या १३ टक्के आरक्षणानुसार नोकरीमध्ये नियुक्त्या देण्याचे जाहीर केले आहे.

राज्य शासनाने सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गाला (एसईबीसी) दिलेल्या १३ टक्के आरक्षणानुसार नोकरीमध्ये नियुक्त्या देण्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गट ब मधील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) संवर्गातील रिक्तपदांवर मराठा समाजातील ३४ जणांची एसईबीसी प्रवर्गातील १३ टक्के कोट्यातून नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच मराठा आरक्षण अंमलबजावणीसंदर्भातील मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे सार्वजनिक बांधकाम खाते हे एसईबीसी आरक्षणाची राज्यात प्रथम अमंलबजावणी करणारा विभाग ठरला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरुवात 

मराठा समाज आरक्षण कायदा नोव्हेंबर २०१८ मध्ये लागू झाल्यानंतर शासनाने हा महाभरतीचा निर्णय घेतला. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदांच्या जागा भरण्यासाठी प्रक्रिया सुरू केली. न्यायालयाने नोकऱ्यांमध्ये एसईबीसी प्रवर्गातून १३ टक्के आरक्षण देण्याचा निकाल दिला. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत रिक्त होणाऱ्या ४०५ संभाव्य पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर ३०० पदांचे आदेश काढण्यात आले असून यामध्ये एसईबीसी प्रवर्गातील ३४ उमेदवारांना नियुक्ती करण्यात आली आहे.

- Advertisement -

चंद्रकांत पाटील यांची घोषणा 

राज्यात मराठा समाजासाठी सामाजिक व शैक्षणिक मागास आरक्षण लागू झाल्यानंतर सुरू केलेल्या भरती प्रक्रियेत सार्वजनिक बांधकाम विभागाने पुढाकार घेतला आहे. इतर पदांसाठीच्या भरती प्रक्रियेमध्येही मराठा समाजासाठीच्या एसईबीसी प्रवर्गातील इतर रिक्त पदे देखील तातडीने भरण्याची कार्यवाही सुरु आहे, असे सार्वजनिक बांधकाम, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. या निमित्ताने आरक्षणानुसार भरतीला सुरुवात होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -