घरमुंबईपोलिसांना हिसका देऊन मोक्काच्या आरोपीचे पलायन

पोलिसांना हिसका देऊन मोक्काच्या आरोपीचे पलायन

Subscribe

नरेश याने बेड्यांमधून हात काढून धूम ठोकली

मोक्का अंतर्गत गुन्ह्यात ठाणे मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त असलेल्या आरोपीला मंगळवारी न्यायालयात सुनावणीसाठी आणेल होते. दरम्यान, न्यायालयाच्या बाहेर आलेल्या आरोपीने पोलिसांच्या हाताला झटका देत नाट्यमयरित्या पलायन केले. या प्रकरणी ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नरेश छाब्रिया (४०) असे त्या आरोपीचे नाव असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

बेड्यांमधून हात काढून चोराने ठोकली धूम

आरोपी नरेश याच्यावर भिवंडीच्या शांतीनगर पोलीसानी मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याची रवानगी ठाणे मध्यवर्ती कारागृहात करण्यात आलेली होती. मंगळवारी त्याला सुनावणीसाठी ठाणे न्यायालयात आणण्यात आले होते.त्यावेळी नरेश याने बेड्यांमधून हात काढून धूम ठोकली.

- Advertisement -

बेजबाबदारपणे वागणाऱ्या पोलिसांवर कारवाई

पोलीस कर्मचाऱ्यांकडे इतर दोन आरोपी असल्याने त्यांना ऐनवेळी नरेशच्या मागे धावणे अशक्य झाले. त्याचवेळी न्यायालयाबाहेरील रहदारीचा फायदा घेत नरेश फरार झाला आहे. त्यामुळे बेजबाबदार पणे वागणाऱ्या पोलिसांवर कारवाईची शक्यता व्यक्त केली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -