घरमुंबईनालासोपारा पोलीस ठाण्यात आरोपीची हत्या; बहिणीच्या आत्महत्येचा घेतला बदला

नालासोपारा पोलीस ठाण्यात आरोपीची हत्या; बहिणीच्या आत्महत्येचा घेतला बदला

Subscribe

बहिणीच्या आत्महत्येचा बदला घेत भावाने सख्या भावोजीची पोलीस ठाण्यात जाऊन चाकूने गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

आपल्या बहिणीच्या आत्महत्येला जबाबदार असलेल्या सख्या भावोजीची पोलीस ठाण्यात जाऊन चाकूने गळा चिरून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना नालासोपारा पोलीस ठाण्यात घडल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना आज दुपारी साडेचारच्या सुमारास नालासोपारा पोलीस ठाण्यातील डिटेक्शन रुममध्ये पोलिसांच्या देखत घडली आहे. याप्रकरणी रवींद्र शंकर काळेल याला हत्येप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

नेमके काय घडले?

नालासोपारा पश्चिमेकडील धनंजय नाका येथील मातृछाया इमारतीत राहणार्‍या कोमल आकाश कोळेकर याविवाहितेने घरगुती भांडणातून १३ ऑक्टोबरला घरात गळफास लावून आत्महत्या केली होती. याप्रकरणी तिचा पती आकाश कोळेकरला नालासोपारा पोलिसांनी अटक केली होती. दरम्यान, आज सायंकाळी साडेचारच्या सुमारास रविंद्र नालासोपारा पोलीस ठाण्यात आला होता. यावेळी पोलीस डिटेक्शन रुममध्ये कोमलच्या आत्महत्येप्रकरणी आकाशची चौकशी करीत होते. रविंद्र थेट डिटेक्शन रुममध्ये शिरला आणि पोलिसांना काही कळायच्या आतच त्याने चाकूने आकाशचा गळा चिरला आणि त्याच्यावर सपासप वार केले. यात आकाश जागीच ठार झाला. याप्रकरणी पोलिसांनी रविंद्रला ताब्यात घेतले आहे.

- Advertisement -

कोमलने आकाशशी प्रेमविवाह केला होता. तेव्हापासून रविंद्र नाराज होता. त्यात कोमलने आत्महत्या केल्याने तो अधिकच संतापला होता. संतापाच्या भरात रविंद्रने पोलीस ठाण्यात शिरून आकाशची गळा चिरून हत्या करून बहिणीच्या आत्महत्येचा बदला घेतला आहे.


हेही वाचा – ६५ वर्षीय व्यावसायिकाने वृद्ध पत्नीची हत्या करत केली आत्महत्या

- Advertisement -

 

नालासोपारा पोलीस ठाण्यात आरोपीची हत्या; बहिणीच्या आत्महत्येचा घेतला बदला
Shashi karpehttps://www.mymahanagar.com/author/shashi-karpe/
गेली २५ वर्षे मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यात पत्रकारिता. राजकीय, सामाजिक विषयांवर लिखाण. वृत्तपत्र क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -