घरमुंबईबलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यावर पीएसआयने केली आत्महत्या

बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यावर पीएसआयने केली आत्महत्या

Subscribe

एका विवाहित महिलेवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर मुंबईतील अंबोली पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरक्षकाने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

एका विवाहित महिलेवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर मुंबईतील अंबोली पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरक्षकाने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. साजन शंकर सानप असे आत्महत्या केलेल्या पोलीस उपनिरिक्षकाचे नाव आहे. या पोलीस उपनिरिक्षकाने पुणे येथे रेल्वेखाली आत्महत्या केली आहे. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास या पोलीस उपनिरिक्षकाच्या विरोधात बलात्कारासह अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती मिळताच पोलीस उपनिरिक्षकाने पुण्यात रेल्वेखाली जावून आत्महत्या केली.

हेही वाचा – सासरच्या लोकांनी मारहाण केली म्हणून पोलिसाची आत्महत्या

- Advertisement -

नेमकं काय आहे प्रकरण?

पीडित महिला जेलरोड येथे वास्तव्यास आहे. पीडित महिलेचा पती जेव्हा मुंबईमध्ये पोलीस उपनिरिक्षक म्हणून कार्यरत होते तेव्हा साजन सानपही त्याच ठिकाणी रायटर म्हणून नेमणूकीस होता. महिला आणि सानप जेलरोडचे रहिवाशी असल्यामुळे पतीच्या माध्यमातून त्यांची ओळख झाली. २०१४ मध्ये सानप पीडितेच्या घरी गेला होता. स्वयंपाक करताना पीडितीचा चेहरा भाजला होता. तिला पाहण्याचा निमित्ताने सानप तिच्या घरी गेला होता. त्यावेळी सानपने तिचा फोन नंबर घेतला. नंतर दोघांचे फोनवर बोलणे सुरु झाले. पतीविरोधात काही फोटो आपल्याकडे असल्याचे सानपने पीडितेला सांगितले. ते फोटो आपण सोशल मीडियामध्ये टाकू अशी धमकी सानपने पीडितेला दिली. २ जून २०१४ रोजी सानप मद्यपान प्राशान करुन पीडितेच्या घरी गेला. तिथे त्याने पीडितेला मद्य पाजले आणि तिच्यावर बलात्कार केला. त्यानंचतर सलग तिन वर्षे हा प्रकार चालू होता, असा महिलेने आरोप केला आहे. आपल्या संबंधाची माहिती पतीला सांगितल्यास पतीची नोकरी घालवण्याची आणि त्याला ठार मारण्याची धमकी सानपने पीडितेला दिली होती. अखेर महिलेने हा प्रकार आपल्या पतीला सांगितला. तिने सानपचे रेकॉर्ड केलेले फोन आपल्या पतीला एकवले. त्यावेळी सानप एका पोलीस अधिकाऱ्यासोबत घरी गेला आणि त्याने महिलेची माफी मागितलीय. परंतु, तो तरीही त्या पीडित महिलेच्या पाठी लागला होता. सानपने एका मित्राच्या आधारे पडित माहिलेची माहिती मिळवत राहिला. सानपने पीडित महिलेच्या मैत्रीणीला फोन करुन बदनाम करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पीडितेच्या पतीने त्याला जाब विचारला. त्यावेळी पोलीस तक्रार केली तर आपण आत्महत्या करु अशी धमकी सानपने दिली. पीडित महिला आणि तिच्या पतीने सोमवारी रात्री पावने अकराच्या सुमारास पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली. त्यानंतर सानपला तक्रारीविषयी माहिती मिळताच मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता सानपने पुण्यात रेल्वेखाली आत्महत्या केली.


हेही वाचा – ‘My Life is Over’ मित्राला मेसेज करुन व्यापाऱ्याची आत्महत्या

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -