घरमुंबईकरियरसाठी त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास यशाची खात्री

करियरसाठी त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास यशाची खात्री

Subscribe

दहावी व बारावीनंतरही विद्यार्थी कोणता अभ्यासक्रम निवडावा याबाबत बरेच साशंक असतात. त्यामुळे बर्‍याचदा ते आपला मित्रमैत्रिण, पालक सांगतील त्या विषयाकडे वळतात. पण त्यात ते यशस्वी होतीलच असे नाही. अभ्यासक्रम निवडताना कोणत्या बाबींचा विचार करावा, कसा निर्णय घ्यावा याबाबत पाटकर कॉलेजच्या प्राचार्य डॉ. शमिष्ठा मटकर यांनी विद्यार्थ्यांना करियर निवडण्याची त्रिसुत्री सांगितली आहे.

अभ्यासक्रम निवडण्याबाबत विद्यार्थ्यांना काय सल्ला द्याल
डॉ. पटकर – अकरावी, बारावीपर्यंत विद्यार्थ्यांना कोणता अभ्यासक्रम निवडावा याबाबत सष्टता नसते. अनेकांना पदवीच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेतल्यानंतरही काय करायचे याबाबत स्पष्टता नसते. त्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यासाठी त्यांनी अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट करून अभ्यासक्रम निवडावा. विद्यार्थ्यांची परिस्थिती असेल तर त्यांनी अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट केल्यास त्यांना आपला कल कोठे आहे हे लक्षात येते. त्यानुसार आपल्याला आपला विषय निवडता येतो. विद्यार्थ्याला रुची असलेल्या विषयात तो शिक्षण घेत असेल तर तो आवडीने शिक्षण पूर्ण करतो. अन्यथा तो कितीही मोठे कॉलेज असले तरी कॉलेजमध्ये जाण्याचे टाळतो. बर्‍याचदा विद्यार्थी ग्रज्युएशन एका विषयातून पूर्ण करतो आणि पोस्ट ग्रज्यूएशन त्याला रुची असणार्‍या विषयात करतो. त्यामुळे त्याला भरपूर धक्के खात आपली गाडी रुळावर आणावी लागते.

- Advertisement -

अ‍ॅप्टिट्यूड शक्य नसेल अशा विद्यार्थ्यांना काय करावे
डॉ. मटकर – बर्‍याचदा विद्यार्थ्यांना आपल्याला एखाद्या विषयात गती असल्याचे कळते, पण त्यात आवड आहे की नाही हे कळत नाही. अशावेळी त्यांनी ज्या विषयामध्ये वाचन करावेसे वाटते. त्याची माहिती घ्यावयाशी वाटते. तो विषय निवडावा. 20 ते 30 टक्के विद्यार्थ्यांमध्ये करियरविषयी फारच अंधकार असतो. पालक त्यांच्याशी बोलत नाही. मित्रपरिवार तसा नसतो. अशा 20 ते 30 टक्के विद्यार्थ्यांनी शिक्षकांशी बोलावे. त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांना योग्य मार्गदर्शन मिळते.

ग्रामीण व गरीब घरातील विद्यार्थ्यांनी कसे मार्गदर्शन घ्यावे
डॉ. मटकर – ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांना ज्याप्रमाणे मार्गदर्शनाचा अभाव दिसून येतो. तसाच अभाव उच्चभ्रू वस्तीमधील विद्यार्थ्यांसाठीही असतो. उच्चभ्रू वस्तीमधील विद्यार्थ्यांचे पालक हे बर्‍याचदा उच्चशिक्षित असल्याने आपल्या कामामध्ये व्यस्त असतात किंवा परदेशात असतात. त्यांना त्यांच्या पाल्यांशी बोलण्यासाठी वेळ नसतो. त्यामुळे ग्रामीण व झोपडपट्टीतील विद्यार्थ्यांप्रमाणे उच्चभ्रू वस्तीतील विद्यार्थ्यांनाही त्यांच्या पालकांकडून मार्गदर्शन मिळतेच असे नाही. त्यामुळे ही मार्गदर्शनाचा अभाव हा सर्वत्रच आढळून येतो. विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन न मिळाल्यास व त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करियरची संधी न मिळाल्यास त्यांच्यामध्ये नकारात्मक भावना निर्माण होते.

- Advertisement -

रोजगारक्षम अभ्यासक्रम निवडण्यासाठी काय करावे
डॉ. मटकर – रोजगारक्षम अभ्यासक्रम निवडण्याकडे आपल्या समाजात सर्वांचा कल असतो. पण बर्‍याचदा विद्यार्थ्यांबरोबर त्यांचे आईवडिलही गोंधळलेले असतात. कोणते शिक्षण घेतल्यावर नोकरी मिळेल याकडे पालकांचा कल असतो. परंतु ज्यामध्ये रोजगार आहे असा अभ्यासक्रम पालकांना लो प्रोफाईल वाटतो. त्यामुळे ते त्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेत नाहीत. पण आपल्याला करियर करायचे असलेला अभ्यासक्रम निवडायचा असेल तर करियरच्या त्रिसूत्रीची अमलात आणणे गरजेचे आहे. आपल्याला ‘ज्या क्षेत्रात करियर करायचे असेल त्या क्षेत्रातील करियर केलेल्या तीन व्यक्तींशी चर्चा करा, तसेच जे सध्या करियर करत आहेत अशा तीन व्यक्तींशी बोला व ज्यांना त्या क्षेत्रात करियर करायचे आहे अशा तीन व्यक्तींशी बोला.’ यातून तुम्हाला निश्चित मार्ग दिसेल व तुमच्या करियरची दिशा स्पष्ट होईल.

पालकांच्या हट्टीपणाचा विद्यार्थ्यांच्या करियरवर फरक पडू शकतो का?
डॉ. मटकर – आम्ही 500 पालकांचे समुपदेशन केले होते. त्यामध्ये आम्हाला 450 पालक विद्यार्थ्यांच्या करियरबाबत हट्टी असल्याचे तर 50 पालक हे समंजस्य असल्याचे दिसून आले. पालकांच्या हट्टीपणामुळे विद्यार्थ्यांचे वर्ष वाया गेल्याचे अनेक प्रकरणातून समोर आले आहे. पालकांनी सांगितलेल्या विषयात विद्यार्थ्याने प्रवेश घेतल्यानंतर तो विषय विद्यार्थ्यांना आवडेलच असे नसते. तसेच तेथील शिक्षक, तेथील वातावरणात विद्यार्थी रमतील याची शक्यताही फार कमी असते. त्यामुळे कितीही चांगल्या कॉलेजला प्रवेश घेतला तरी विद्यार्थ्यांना काहीही फरक पडत नाही.

चांगल्या कॉलेजमधील प्रवेशावर विद्यार्थ्यांचे करियर अवलंबू असते या समजाबद्दल काय सांगाल
डॉ. मटकर – ज्याप्रमारे उच्चभू्र वस्तीमध्ये हुशार मुले जन्माला येतात त्याचप्रमारे झोपडपट्टीमध्येही हुशार विद्यार्थी जन्माला येतात. त्याचप्रमाणे एखाद्या लहान कॉलेजमधील प्रशासन हे नेहमची सातत्यपूर्ण बदल करण्याकडे भर देत असतील किंवा कॉलेजमधील शिक्षणाचा दर्जा वाढवण्यावर त्यांचा अधिक भर असतो. विद्यार्थ्यांच्या चांगल्या करियरसाठी ज्या कॉलेजमधील शिक्षक व कर्मचारी धडपडत असतात अशा कॉलेजमध्ये विद्यार्थी नक्कीच घडतात. त्यासाठी विद्यार्थी हुशारच असले पाहिजे असे नाही. कॉलेज चांगले असले म्हणेज आपला विद्यार्थी हुशार होईल हा गैरसमज आहे नसते. तो शिक्षक कसा आहे. तो एखादा विषय कशाप्रकारे समजवून सांगू शकतो. त्याची विद्यार्थ्यांप्रती किती तळमळ आहे यावरही विद्यार्थ्यांचे भवितव्य अवलंबून असते.

काऊन्सिलिंग सेंटरचा विद्यार्थ्यांना कितपत फायदा मिळतो
डॉ. मटकर – काऊन्सिलिंग सेंटर विद्यार्थी बर्‍याचदा मोकळ्या पद्धतीने बोलत नाहीत. त्यासाठी वेगवेगळे सेशन व्हावे. यामध्ये प्रथम आईवडिल, मग आई वडिल व मुलगा व शेवटी फक्त मुलासोबत सेशन व्हावे यामध्ये शेवटच्या वेळी मुलगा बर्‍याचदा वेगळी माहिती समोर येते. 98 टक्के मुलांशी सांमजस्याने बोलल्यास ते त्यांची आवड व्यक्त करतात. बर्‍याचदा अभ्यासक्रम निवडण्याबाबत प्रत्येक मुलगा काहीतरी ठरवून येत असतो. त्याच्याशी व्यवस्थित बोलून त्याला कशामध्ये गती आहे हे ओळखता येते. पण जेव्हा पालक ठरवून येतात. तेव्हा काहीही करता येत नाही.

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -