घरमुंबईकल्याण येथील १०० मुजोर रिक्षाचालंकावर कारवाई

कल्याण येथील १०० मुजोर रिक्षाचालंकावर कारवाई

Subscribe

कल्याण येथील १०० मुजोर रिक्षाचालंक आणि १० वारांगणांनावर धडक कारवाई करण्यात आली आहे.

कल्याण रेल्वे स्थानकाबाहेरील परिसरात मुजोर रिक्षा चालक आणि वारांगणांचा वावर वाढला आहे. तसेच अनेकदा या मुजोर रिक्षाचालकांकडून लूट देखील केली जाते. त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी अनेक दिवसांपासून नागरिकांकडून होत होती. आज या मुजोर रिक्षाचालकांवर आणि वारांगणांवर कल्याण पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. तब्बल १०० रिक्षा चालक आणि १० वारांगणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर धडक कारवाईचा बडगा उगारला आहे.

१० वारांगणांना ताब्यात

कल्याण स्टेशन परिसर हा गुन्हेगारांचा अड्डा बनला आहे. रात्रीच्या वेळेस याठिकाणी मुजोर रिक्षाचालकांची दादागिरी सुरू असते. त्यातच वारंगणांचा वावर मोठया प्रमाणात सुरू असतो. गुंडागर्दी, फेरीवाल्यांची दादागिरी आणि वारांगणाच्या त्रासामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. स्टेशन परिसरात चोरी , लुटमारीच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कल्याण स्टेशन परिसर स्वच्छ करण्यासाठी पोलिसांनी ऑल आऊट ऑपेशन सुरू केले आहे. बुधवारी रात्रीच्या सुमारास कल्याण एसीपीच्या नेतृत्वाखाली कल्याण पोलिसांचा विशेष पथकाने ही धडक कारवाई केली. या ऑपरेशन दरम्यान पोलिसांनी तब्बल १०० रिक्षा चालकाविरोधात कारवाई केली आहे. १४ फेरीवाल्यासह १० वारांगणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे कल्याण स्टेशन परिसराने सुटकेचा श्वास सोडला आहे. मात्र पोलिसांची पाठ फिरताच परिस्थिती जैसे थे दिसून आली आहे. त्यामुळे पोलिसांच्या कारवाई सातत्य ठेवण्याची मागणी नागरिकांकडून होत असून, अशी कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

वाचा – रिक्षाचालकांचं आयुष्य धोक्यात; ८५ टक्के चालकांना तंबाखूचं व्यसन

वाचा – फक्त १५ हजार १९ फेरीवाले परवान्यास पात्र

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -