घरमुंबईठाणे महापालिकेचा चौथ्या दिवशीही कारवाईचा धडका

ठाणे महापालिकेचा चौथ्या दिवशीही कारवाईचा धडका

Subscribe

127 हातगाड्या, 52 टपर्‍या, 241 बांधकामे हटवली

अनधिकृत हातगाडया टपर्‍या आणि फूटपाथवरील बांधकामांवर ठाणे महापालिकेकडून जोरदार कारवाई सुरू आहे. चौथ्या दिवशीही शुक्रवारी पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने धडक कारवाई करीत 127 हातगाड्या, 52 टपर्‍या, फूटपाथवरील 241 बांधकामे हटवली आहेत. पालिकेच्या कारवाई अनधिकृत धारकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

ठाणे शहरामध्ये विविध परिसरात महानगरपालिकेची अतिक्रमण विरोधातील कारवाई जोरदारपणे सुरु आहे. कारवाईच्या आजच्या चौथ्यादिवशी विविध परिसरातील टपर्‍या, पोस्टर्स व फुटपाथवरील बांधकामे तोडण्यात आली. शुक्रवारी 127 हातगाड्या, 52 टपर्‍या, 10 बॅनर्स आणि 241 फुटपाथवरील बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. या कारवाईअंतर्गत वागळे प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील 37 हातगाड्या, 2 बॅनर्स, 20 फुटपाथवरील अतिक्रमणे, दिवा प्रभाग समितीमध्ये 12 हातगाड्या,19 फुटपाथवरील अतिक्रमणे 4, टपर्‍या, माजिवडा प्रभाग समितीमध्ये 3 फुटपाथवरील अतिक्रमणे,17 हातगाड्या, 02 बॅनर्स,17 फेरीवाले, वर्तकनगर प्रभाग समितीमध्ये 17 फुटपाथवरील अतिक्रमणे, 8 हातगाड्या, 28 टपर्‍या, 49 फेरीवाले, नौपाडा प्रभाग समितीमध्ये 28 फुटपाथवरील अतिक्रमणे, 7 हातगाड्या, लोकमान्य सावरकर प्रभाग समितीमध्ये 11 फुटपाथवरील अतिक्रमणे,12 हातगाड्या, 4 बॅनर्स, कळवा प्रभाग समिती 18 फुटपाथवरील अतिक्रमणे,12 हातगाड्या,5 टपर्‍या, उथळसर प्रभाग समितीमध्ये 6 हातगाड्या,72 फुटपाथवरील अतिक्रमणे, 8 टपर्‍या, तर मुंब्रा प्रभाग समितीमधील 23 हातगाड्या,10 लाकडी बाकडे, 4 कोंबडी पिंजरे, 7 लोखंडी स्टॅन्ड, 5 टपर्‍या, 32 दुकानांसमोरील शेड हटवण्यात आले. शहरातील अतिक्रमण, अनधिकृत बॅनर्स आणि पोस्टर्सवरील ही कारवाई पोलिस बंदोबस्तात करण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -