Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई मद्यप्राशन करून वाहन चालविणार्‍या 35 जणांवर कारवाई

मद्यप्राशन करून वाहन चालविणार्‍या 35 जणांवर कारवाई

इतर गुन्ह्यांत 4 हजार 56 जणांवर दंडात्मक कारवाई

Related Story

- Advertisement -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी जारी केलेली संचारबंदी आणि वाहतूक पोलिसांच्या आवाहनाला मुंबईकरांनी चांगलाच प्रतिसाद दिला. त्यामुळे ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्हची शुक्रवारी सकाळपर्यंत नीचांक कारवाईची नोंद झाली होती. मद्यप्राशन करुन वाहन चालविणार्‍या अवघ्या 35 जणांविरुद्ध वाहतूक पोलिसांनी कारवाई केली तर इतर गुन्ह्यांत 4 हजार 56 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांतील हा नीचांक असल्याचे पोलिसांनी सांगितले.

शहरात वाहतूक पोलिसांनी सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त आणि नाकाबंदी ठेवल्यामुळे रात्री उशिरा कुठेही अनुचित प्रकार घडला नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. नवीन वर्षाचे स्वागत करताना मद्यप्राशन करुन वाहन चालवू नका, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले होते. अशा घटना रोखण्यासाठी काही दिवसांपासून वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती.

- Advertisement -

31 डिसेंबरला मोठ्या प्रमाणात अशा घटना घडून अपघात होत असल्याने संपूर्ण शहरात जागोजागी वाहतूक पोलिसांना तैनात करण्यात आले होते. इतकेच नव्हे तर बार, पब, हॉटेल मालकांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या होत्या. 31 डिसेंबरला दुपारी ते बुधवारी सकाळी सहापर्यंत वाहतूक पोलिसांनी 35 मद्यपी चालकांविरुद्ध कारवाई केली होती. त्यात दुचाकी तर चारचाकी वाहनचालकांचा समावेश आहे.

ओव्हर स्पिडिंग आणि रॅश ड्रायव्हिंग, लायसन्स, पीयुसी, ट्रिपल सीट, विना हेल्मेट, सीट ब्लेट न लावणे अशा प्रकारच्या 4 हजार 56 केसेसची नोंद करुन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. सुसाट वेगात वाहन चालविणार्‍या चालकाविरुद्धही पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला होता. गेल्या वर्षी 677 मद्यपींवर वाहन चालविताना पोलिसांनी कारवाई केली होती.

- Advertisement -