घरमुंबईडोंबिवलीमधील वाढीव बिल घेणार्‍या रुग्णालयावर कारवाई

डोंबिवलीमधील वाढीव बिल घेणार्‍या रुग्णालयावर कारवाई

Subscribe

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात संशयित व निदान झालेल्या रुग्णांचे नॉन कोविड रुग्णांमध्ये होणारे संक्रमण टाळण्याकरिता कोविडची लक्षणे असणार्‍या अत्यवस्थ रुग्णांवर उपचार करण्यासाठी मे. श्री. स्वामी समर्थ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, गोपाळभवन, स्वामी समर्थ मंदिराजवळ, डोंबिवली पूर्व येथील 20 बेड क्षमतेचे रुग्णालय कोविड रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आलेले आहे.

हे कोविड रुग्णालयात उपचार करण्यात आलेल्या रुग्णांकडून अवाजवी बिले आकारली जात असल्याबाबतच्या तक्रारी महापालिकेस प्राप्त झाल्यामुळे महापालिकेमार्फत नियुक्त करण्यात आलेल्या लेखापरीक्षक यांचेकडून मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांचे सनियंत्रणात रुग्णांना आकारणी करण्यात आलेल्या बिलांची तपासणी केली. त्यात तथ्य आढळल्यामुळे या रुग्णालयांवर कारवाई करण्यात आली. या रुग्णालयास कोविड रुग्णालय म्हणून घोषित केलेले आदेश रद्द करणेबाबत तसेच या रूग्णालयाची कडोंमपाद्वारे मुंबई नर्सिंग होम रजिस्ट्रेशन रुग्णालय नोंदणी 30 सप्टेंबर 2020 किंवा उपरोक्त अनियमितता दूर करुन रक्कम परत करणे यापैकी जे नंतर घडेल तोपर्यंत निलंबित करण्याचा आदेश महापालिका अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी दिला केला आहे.

- Advertisement -

या रुग्णालयामध्ये कोणत्याही प्रकारचे नविन रुग्ण उपचारासाठी दाखल करुन घेण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. तसेच या आदेशाचे पालन करुन घेणे व रुग्णालयात आज रोजी दाखल असलेल्या उपचाराधीन कोव्हिडग्रस्त रुग्णांवर आय.सी.एम.आर व शासनाच्या आदेशानुसार समाधानकारक औषधोपचार होईल व त्यांच्याकडून शासकीय दराने बिलाची आकारणी केली जाईल, हे निश्चित करण्याकरीता व रुग्णालयातील सर्व रुग्ण डिसचार्ज होईपर्यंत परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने समिर सरवणकर, वैद्यकीय अधिकारी यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -