ठाण्यात पालिकेने केली थकीत मालमत्ताधारकांवर कारवाई

ठाण्यात महापालिकेच्यावतीने मालमत्ता कर तसेच पाणी कर वसुलीची मोहीम तीव्र करण्यात आली असून देयके न भरणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई करण्यात येत आहे.

Mumbai
Thane municipal office
ठाणे महापालिका

ठाण्यात महापालिकेच्यावतीने मालमत्ता कर तसेच पाणी कर वसुलीची मोहीम तीव्र करण्यात आली असून देयके न भरणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईतंर्गत ८८२ मालमत्तांवर जप्तीची कारवाई करत १५९ मालमत्ता सील करण्यात आल्या असून ९८ नळसंयोजन खंडीत करण्यांत आले आहे. दरम्यान, जप्तीची कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी आपली मालमत्ता कर आणि पाणी कराची थकबाकी रक्कम त्वरित करावी, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

कराची रक्कम जमा केली नाही

२०१८-१९ या आर्थिक वर्षात ज्या मालमत्ताधारकांनी कराची रक्कम महापालिकेकडे जमा केलेली नाही, अशा मालमत्ताधारकांच्या मालमत्तेवर कडक कारवाई करण्याचे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी निर्देश दिले होते. त्यानुसार ठाणे महापलिकेच्या प्रभागनिहाय सदरची कारवाई करण्यात येत आहे.

पालिकेतर्फे मालमत्ता कर संकलन

नागरिकांना मालमत्ता कर जमा करणे सोईचे व्हावे या दृष्टीकोनातून १ डिसेंबर २०१८ ते ३१ मार्च २०१९ पर्यंत महापालिकेची सर्व मालमत्ता कर संकलन केंद्र सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी (२१ मार्च, २०१९ वगळून) पूर्णवेळ तसेच सर्व रविवारी सकाळी १०.३० ते १.३० या वेळेत कार्यान्वीत राहणार आहेत. तसेच ज्या गृहसंकुलात, उद्योग संकुलात मालमत्ता कराची सदनिका, युनिटनिहाय स्वतंत्र बिले दिली जातात, अशा गृहसंकुल, उद्योग संकुलात मालमत्ता कर वसुलीचा कॅम्प संबंधितांच्या विनंतीनुसार आयोजित करण्यांत येईल याकरिता प्रभाग कार्यालयाकडील मालमत्ता कर विभागाकडे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

कर वेळेत भरण्याचे आवाहन

महापालिकेच्या www.thanecity.gov.inया संकेत स्थळावर ऑनलाईन पध्दतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. तरी सर्व मालमत्ता धारकांनी मालमत्ता कर वेळेत भरुन सहकार्य करावे, असेही आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here