Corona: ‘या’ टीव्ही अभिनेत्रीसह कुटुंबातील २२ जण आढळले कोरोना पॉझिटिव्ह

Mumbai
coronavirus
कोरोना व्हायरस

टीव्ही अभिनेत्री मोहिना कुमारी सिंह कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर येत आहे. मोहिना कुमारी उत्तराखंड सरकारचे कॅबिनेट मंत्री सतपाल महाराज यांनी सून असून सतपाल महाराजांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समजते. या दोघांसह घरातील तब्बल २२ जणांना कोरोना झाल्याची धक्कादायक माहिती मिळत आहे. सतपाल महाराज यांची पत्नी आणि इतर स्टाफमध्येही कोरोनाची लक्षणे आढळली आहेत. या सर्वांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. छोट्या पडद्यावरील ये रिश्ता क्या केहलाता है या मालिकेत मोहिना कुमारी हिला प्रेक्षकांनी पाहिले आहे.

अभिनेत्री आणि कोरिओग्राफीही करते 

मोहिना सध्या क्वारंटाईन असून जिल्हा प्रशासनाने त्यांच्या कोठीवाले या भागालाही कंन्टेन्मेंट झोन घोषित केले आहे. मोहिना कुमारीने प्रसिद्ध टीव्ही शो ‘ये रिश्ता क्या केहलाता है’मध्ये प्रमुख भूमिका साकारली होती. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात २०१९ मध्ये सतपाल महाराज यांचा मुलगा सुयश रावत याच्याशी तिचा विवाह झाला होता. मोहिना केवळ अभिनेत्री नसून सुंदर नृत्यांगणाही आहे. मध्यप्रदेशमधील रीवा येथील शाही घराण्यात जन्मलेल्या मोहिना कुमारीने ‘डान्स इंडिया डान्स’च्या सीजन ३ पासून करिअरची सुरुवात केली होती. त्याशिवाय ‘दिल दोस्ती डान्स’मध्येही ती सहभागी होती. ‘झलक दिखला जा’ या डान्स रिअॅलिटी शोमधील काही सीजनमध्ये तिने डान्स कोरिओग्राफर म्हणून काम केले आहे.

हेही वाचा –

रेल्वेत एकाही प्रवासी मजुराचा अन्न-पाण्यावाचून मृत्यू झालेला नाही; रेल्वेमंत्र्यांचा दावा