घरमनोरंजनआझम खान यांना तिकीट देऊ नका; रेणुका शहाणे पुन्हा भडकल्या

आझम खान यांना तिकीट देऊ नका; रेणुका शहाणे पुन्हा भडकल्या

Subscribe

निवडणूक आयोगाने देखील आझम खान यांच्या वक्तव्यांची गंभीर दखल घेत त्यांच्याविरोधात कारवाई करत ७२ तासांची प्रचारबंदी केली आहे.

अभिनेत्री आणि भाजपच्या उमेदवार जया प्रदा यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या समाजवादी पार्टीचे उमेदवार आझम खान यांच्यावर अभिनेत्री रेणुका शहाणे चांगल्याच भडकल्या आहेत. रेणुका शहाणे यांनी आझम खानच्या वक्तव्यांचा जाहीर निषेध व्यक्त केला आहे. अशा व्यक्तीला निवडणुकीचे तिकीट दिले जाऊ नये अशी मागणी त्यांनी ट्विटरवरुन केली आहे.

- Advertisement -

आझम खान यांच्यावर प्रचार बंदी

अभिनेत्री जया प्रदा उत्तरप्रदेशच्या रामपूरमधून आझम खान यांच्याविरोधात निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. एका प्रचार सभे दरम्यान आझम खान यांनी जयाप्रदा यांच्यावर आक्षेपार्ह टीका केली आहे. आझम खान यांनी जया प्रदा यांच्यावर कंबरेखालच्या भाषेत टीका केली. या टीकेवरुन त्यांच्यावर सर्वच स्तरावरुन जोरदार टीका होत आहे. त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. तसंच निवडणूक आयोगाने देखील आझम खान यांच्या वक्तव्यांची गंभीर दखल घेत त्यांच्याविरोधात कारवाई करत ७२ तासांची प्रचारबंदी केली आहे. दरम्यान, रेणुका शहाणे यांनी ट्विटरवरुन आझम खान यांच्याविरोधात टीका केली आहे.

- Advertisement -

काय म्हणाल्या रेणुका शहाणे

“महिलांचा आदर न करता त्यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या आझम खान सारख्या व्यक्तींना कदापी निवडणुकीचे तिकीट देता कामा नये. आझम खान यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. मात्र केवळ एफआयआर दाखल करुन चालणार नाही. तर त्यांच्याविरोधात प्रत्यक्षात कारवाई करणे गरजेचे आहे. ही कारवाई नक्की होईल का? हा प्रश्न आहे. मुळात त्यांना २०१९ ची लोकसभा निवडणूक लढविण्याची परवानगीच देता कामा नये”, असं ट्विट करत रेणुका शहाणे यांनी केले आहे. महत्वाचे म्हणजे त्यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना या ट्विटमधअये टॅग केले आहे.

एम जे अकबरांवर टीका

दरम्यान, काही दिवसापूर्वी रेणुका शहाणे यांनी भाजपा नेते एम. जे. अकबर यांच्यावर ट्विटरवरुन टीका केली होती. भाजपने ट्विटरवर एक नविन मोहिम सुरु केली. ‘मैं भी चौकीदार’ हॅशटॅगच्या माध्यमातून ट्विटरवर भाजपने मोहिम सुरु केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवर आपले नाव बदलून ‘चौकीदार नरेंद्र मोदी’ असे केले. मोदींशिवाय भाजपमधील नेत्यांनी देखील आपल्या ट्विटर अकाऊंटच्या नावापुढे चौकीदार असे लिहिले. भाजपचे नेते एम. जे.अकबर हे देखील या मोहिमेत सहभागी होत त्यांनी यावर ट्विट केले होते. या ट्विटनंतर रेणुका शहाणे यांनी एम जे अकबरांवर टीका केली. ‘तुम्ही चौकीदार असाल तर महिला असुरक्षितच’ अशी टीका त्यांनी केली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -