घरमुंबई‘नाईट चार्ज’आडून टॅक्सी चालकांकडून लूट

‘नाईट चार्ज’आडून टॅक्सी चालकांकडून लूट

Subscribe

रात्री १२ पूर्वीच आकरला जातो अतिरिक्त चार्ज

मुंबईकरांना रिक्षा किंवा टॅक्सी चालकांची मुजोरी किंवा मनमानी काही नवीन नाही. मात्र आता रात्री प्रवास करणार्‍या प्रवाशांना चुना लावण्याचे काम मुंबईतील टॅक्सी चालकांकडून होताना दिसून येत आहे. रात्री १२ वाजताच्या नंतर प्रवाशांना टॅक्सी मिळावी यासाठी परिवहन विभागाने टॅक्सीवाल्यांना रात्रीचे भाडे आकारण्याची मुभा दिली आहे, परंतु त्याचा गैरफायदा उचलत अनेक टॅक्सी चालक १२ वाजताच्या आधीच नाईट चार्ज लावून प्रवाशांपासून अतिरिक्त भाडे आकारात आहेत.यासंबंधी अनेक तक्रारी परिवहन विभागाकडे करण्यात आल्या आहेत.

रिक्षा चालकांची मुजोरी, जवळचे भाडे नाकारने अशा मुंबईकरांच्या दररोज तक्रारी असतात. या तक्रारींवर टॅक्सी आणि रिक्षा चालकांवर आरटीओने विशेष मोहीम सुरू करून कडक कारवाईसुद्धा करण्यात येत. मात्र आता एक नवीन समस्या निर्माण झाली आहे. परिवहन विभागाने मुंबईतील टॅक्सीचे भाडे दर निश्चित करून दिले आहे. दिवसा आणि रात्रीला वेगळे दर आकारायचे असतात. सकाळी 5 ते रात्री 12 वाजेपर्यंत दिड किलोमीटरला 22 रूपये, त्याचप्रमाणे रात्री 12 नंतर ते सकाळी 5 वाजेपर्यंत 28 रूपये भाडे आकारायचे आहे. मात्र टॅक्सी चालकांकडून मीटरमध्ये बदल करून रात्री 12 वाजताच्या आतच रात्री 12 नंतरचे दर आकारले जात असल्याची प्रकरणे वाढत आहेत. यासंबंधी तक्रारीसुद्धा परिवहन विभागाकडून प्राप्त झाल्या आहेत. आता जादा भाडे आकारणी करणार्‍या टॅक्सी आणि रिक्षा चालकांवर कारवाईची मोहीम परिवहन विभाग सुरू करणार आहे. यासंबंधित दैनिक ‘आपलं महानगर’ने प्रादेशिक परिवहन अधिकारी अभय देशपांडे यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले कि, परिवहन विभागाने टॅक्सी आणि रिक्षा दोघांनाही भाडे दर ठरवून दिले आहे. त्या दरांपेक्षा आणि अवेळी जादा दर प्रवाशांना आकारल्या जात असल्यास, अशा चालकांवर कारवाई करण्यात येत असते. अशा मुजोर चालकांवर कारवाई करण्याची सध्या मोहीम सुद्धा सुरू आहे.

- Advertisement -

प्रवाशांना व्हा जागे ?

मुंबई शहरातील टॅक्सी, रिक्षाचालक जर तुमच्याकडून जादा भाडे आकारत असतील, तर तुम्ही परिवहन विभागाच्या वेब साईडवर किंवा टोल फ्री क्रमांकावर अथवा लेखी स्वरूपात तक्रार करावी. त्यानंतर वाहनचालकांवर मोटार परिवहन कायद्यांतर्गत कारवाई केली जाते. यामध्ये चालकाचा परवाना रद्द करणे आणि आर्थिक दंड आकारणे, अशी कारवाई केली जाते. त्यामुळे प्रवाशांनी यासंबंधी जागृत राहणे आवश्यक आहे. परंतु अनेक प्रवाशांकडून यासंबंधी रितसर तक्रार होत नसल्याने अशा मुजोर टॅक्सी चालकांवर कारवाई करणे शक्य होत नाही, असे परिवहन विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

- Advertisement -

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -