घरमुंबईमुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाला आदित्य ठाकरेंची दांडी

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाला आदित्य ठाकरेंची दांडी

Subscribe

उद्योग संचलनालय आणि राज्य सरकारच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या कार्यक्रम पत्रिकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, युवासेना प्रमुख आदीत्य ठाकरे यांचे नाव होते. मात्र निमंत्रण पत्रिकेत नाव असूनही आदित्य ठाकरे यांनी या कार्यक्रमाकडे चक्क पाठ फिरवली.

उद्योग संचलनालय आणि राज्य सरकारच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री रोजगार निर्मीती कार्यक्रम मंगळवारी वरळीच्या एन.एस.सी.आय येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित पार पडला. मात्र या कार्यक्रमाला चक्क युवासेना प्रमुख आदीत्य ठाकरे यांनी दांडी मारल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. भाजप-शिवसेना युती होणार असे किती जरी सांगितले जात असले तरी शिवसेनेला आदित्य ठाकरे हेच मुख्यमंत्री व्हावे, असे वाटते. त्यामुळे मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या या कार्यक्रमाला आदित्य यांनी का दांडी मारली असावी? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. दरम्यान उद्योग संचलनालय आणि राज्य सरकारच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या कार्यक्रम पत्रिकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, युवासेना प्रमुख आदीत्य ठाकरे यांचे नाव होते. मात्र निमंत्रण पत्रिकेत नाव असूनही आदित्य ठाकरे यांनी या कार्यक्रमाकडे चक्क पाठ फिरवली.

या कार्यक्रमात मुख्यमंत्री काय म्हणाले?

दरम्यान यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी तरुणांना ‘रोजगार मागणारे नाही तर रोजगार देणारे व्हा’ असे सांगितले. ‘तरूणांनी केवळ रोजगार न मागता रोजगार निर्मिती करावी यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेंतर्गत मदत मिळेल’, असे देखील त्यांनी सांगितले. ‘यावर्षी या योजनेला पाचशे कोटीची तरतूद केली आहे. या योजनेला मिळणारा प्रतिसाद बघता पुढच्या वर्षी एक हजार कोटी किंवा दोन हजार कोटी देण्याची तयारी आहे. कारण यातून मोठ्या प्रमाणात उद्योजक तयार होतील आणि रोजगाराला चालना मिळेल’, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ‘२०१४ साला पूर्वीच्या पाच वर्षांत महाराष्ट्राची औद्योगिक क्षेत्रात सातत्याने पिछेहाट होत होती. परंतु गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्राने पहिला क्रमांक परत मिळवला आहे. एफडीआय, रोजगार निर्मितीत महाराष्ट्र पहिला आहे. नीती आयोगानेदेखील याची आकडेवारी दिली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक येत आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात तरुणाई आहे. या तरुणाईला वर्क फोर्समध्ये परावर्तीत करू शकत नाही, तोपर्यंत देश प्रगती करू शकत नाही’, असे मुख्यमंत्री म्हणाले.


हेही वाचा- इको फ्रेंडली बाप्पा काँटेस्ट – २०१९
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -