घरमुंबईआदित्य ठाकरे 'वरळी' विधानसभेतून लढणार

आदित्य ठाकरे ‘वरळी’ विधानसभेतून लढणार

Subscribe

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे वरळी विधानसभेतून लढणार असल्याची घोषणा आमदार अनिल परब यांनी वरळीतल्या शिवसैनिकांनामध्ये केली आहे.

राज्यात विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवावी अशी मागणी युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे वरळी विधानसभेतून लढणार असल्याची घोषणा आमदार अनिल परब यांनी वरळीतल्या शिवसैनिकांनामध्ये केली आहे. वरळीतील गटप्रमुखांच्या मेळाव्यात त्यांनी ही घोषणा केल्याचे समोर आले आहे. तसेच कामाला लाग‘, असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे. याआधी युवासेनेचे पदाधिकारी वरुण सरदेसाई यांनी देखील इन्स्टाग्रामवर यासंदर्भात पोस्ट टाकून आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढण्याची मागणी केली होती.

काय म्हणाले होते वरुण सरदेसाई

युवासेना सरचिटणीस वरूण देसाई यांनी इन्स्टाग्रामवरून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याबरोबरचा एक फोटो शेअर केला होता. यामध्ये त्यांनी आदित्य ठाकरे यांना टॅग केले होते. तसेच हीच वेळ आहे, हीच संधी आहे. महाराष्ट्र वाट पाहतोय‘, असे म्हणत त्यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवावी, अशी मागणी त्यांनी केली होती.

- Advertisement -

लोकसभा निवडणुकीत शिवसेना भाजप युतीला महाराष्ट्रात मोठे यश मिळाले आहे. त्यानंतर आता शिवसेनेने आगामी विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या आगामी काळात राज्याच्या विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार असून शिवसेनेकडून आता त्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – आदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्री पद देण्यास तयार-फडणवीस


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -