घरमुंबईआदित्य ठाकरे करणार जन आशीर्वाद दौरा

आदित्य ठाकरे करणार जन आशीर्वाद दौरा

Subscribe

युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे राज्यभर जन आशीर्वाद दौरा करणार आहेत.

युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे राज्यभरात जन आशीर्वाद दौरा करणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. शुक्रवार पासून ते सोलापूर जिल्हा आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात जाऊन मतदारांचे आभार मानणार आहेत. त्यानंतर आदित्य ठाकरेंचे राज्यभरात चौकसभा घेतल्या जातील, अशी माहिती युवासेनेच्या सुत्रांकडून मिळाली आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर हा दौरा महत्त्वाचा आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात युतीला मिळालेल्या यशानंतर विधानसभा निवडणुकीतही तसेच घवघवीत यश मिळवण्याचा प्रयत्न शिवसेना-भाजप करत आहे. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्याअगोदरच शिवसेनेने विधानसभेची तयारी करण्यास सुरुवात केली आहे.

आदित्य ठाकरे मुख्यमंत्री व्हावा यासाठी सर्व मोर्चेबांधणी?

येत्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांना उमेदवारी देऊन त्यांना मुख्यमंत्री पदी विराजमान करण्याचे स्वप्न शिवसेना बघत असल्याची चर्चा सुरु आहे. शिवाय त्या दृष्टीकोनाने शिवसेनेचे प्रयत्न देखील आहेत. दोन दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री पदावरुन केलेल्या वक्तव्यावरुन भाजप आणि शिवसेना यांच्यात पुन्हा मतभेद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र शिवसेनेने आपल्या ‘सामना’ मुखपत्रातून ‘मुख्यमंत्री शिवसेनेचाच’ अशी भूमिका मांडली. त्यामुळे सेनेचा हा मुख्यमंत्री आदित्य ठाकरेच असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचसाठी शिवसेनेने मोर्चेबांधनी सुरु केली असून आदित्य ठाकरे राज्यभर जन आशिर्वाद दौरा घेत आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. दरम्यान, मुख्यमंत्री पदाबाबत भाजपची भूमिका काय? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री बनवण्यासाठी शिवसेनेची मोर्चेबांधणी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -