घरमुंबई५० वर्षांपूर्वी आजोबांनी हटकलेली लुंगी; नातवाने नेसली

५० वर्षांपूर्वी आजोबांनी हटकलेली लुंगी; नातवाने नेसली

Subscribe

आता 'केम छो वरळी!' बॅनर्सनंतर आदित्य ठाकरे स्वत: लुंगी नेसून प्रचार करत आहेत.

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सध्या मतदारराजाला खूष करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण, या प्रचारादरम्यान नातू आदित्य ठाकरेंना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ५० वर्षांपूर्वी दिलेल्या नाऱ्याचा विसर पडला असल्याचं दिसतंय. कारण, सध्या आदित्य ठाकरेंनी प्रचारादरम्यान नेसलेल्या लुंगीचा व्हिडीओ व्हायरल होतोय. आदित्य ठाकरेंनी दक्षिण भारतीय मतदात्यांना आकर्षित करण्यासाठी लुंगी नेसून प्रचार केला. यामुळे युवासेना आदित्य ठाकरे यांना १९७० साली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ‘बजाव पुंगी, हटाव लुंगी’ या दिलेल्या नाऱ्याचा विसर पडला, अशी चर्चा रंगू लागली आहे.

‘बजाव पुंगी, हटाव लुंगी’ भूमिकेनंतर बाळासाहेबांची राजकारणात एन्ट्री 

१९७० साली दाक्षिणात्य लोकांना मुंबईतून बाहेर पळवून लावण्याची भूमिका बाळासाहेबांनी घेतली होती. तेव्हापासूनच बाळासाहेबांची राजकारणात खरी एन्ट्री झाली होती. बाळासाहेब आधीपासूनच लुंगी घालणाऱ्यांच्या विरोधात होते. मुंबईत दक्षिण भारतातून नोकरीसाठी येणाऱ्या लोकांची नावे बाळासाहेब त्यांच्या मार्मिकेत छापत होते. त्यासोबतच शिवसैनिक तमिळ चित्रपटांच्या प्रदर्शनालाही विरोध करत होते. पण, आज त्याच ठाकरे कुटुंबातले आदित्य ठाकरे दाक्षिणात्य लोकांना आकर्षित करण्याचा एकही संधी सोडत नसल्याचं दिसतंय.

- Advertisement -

आदित्य ठाकरे हे ठाकरे घराण्यातील पहिले ठाकरे ठरलेत, जे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. ते यंदाची निवडणूक वरळी विधानसभा मतदारसंघातून लढवत आहेत. या मतदारसंघात आदित्य ठाकरेंचे वेगवेगळ्या भाषेतील बॅनर्स ही लावण्यात आले आहेत. आता बॅनर्सनंतर आदित्य ठाकरे स्वत: लुंगी नेसून प्रचार करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -