घरमुंबईमुंबईबाहेर समायोजनाची सक्ती नाही

मुंबईबाहेर समायोजनाची सक्ती नाही

Subscribe

अतिरिक्त शिक्षकांना दिलासा

संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरणार्‍या मुंबईतील शिक्षकांना अन्य जिल्ह्यातील शाळांमध्ये शक्यतो समायोजित करू नये. त्याचप्रमाणे अन्य जिल्ह्यात समायोजित शिक्षक पुन्हा मुंबईत येऊ इच्छित असतील तर त्यांना मूळ शाळेत उपलब्धतेनुसार समायोजित करावे, असे परिपत्रक शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने शुक्रवारी जाहीर केले. त्यानुसार मुंबई विभागातून अन्य जिल्ह्यात समायोजित केलेल्या व अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.

मुंबईतील शिक्षक संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या अनेक शिक्षकांना मुंबईबाहेर ठाणे, पालघर, रायगडमधील शाळांमध्ये समायोजित करण्यात आले होते. परंतु या शिक्षकांना मुंबइहून रोज ये-जा करणे त्रासदायक ठरत होते. विशेषतः महिला शिक्षकांना प्रवास व मानसिक ताणाचा सामना करावा लागत होता. मुंबईमध्ये सध्या ८५० आणि अन्य विभागात १०३५ शिक्षक अतिरिक्त आहेत. या शिक्षकांवरही समायोजनेंतर्गत अन्य जिल्ह्यामध्ये जाण्याची टांगती तलवार होती. त्यामुळे 2016 पासून विविध शिक्षक संघटनांकडून मुंबईतील शिक्षकांचे मुंबई बाहेर समायोजन होऊ नये, अशी मागणी शिक्षक संघटनांकडून करण्यात येत होती.

- Advertisement -

यापार्श्वभूमीवर नुकतीच शिक्षक संघटनाची शिक्षणमंत्री आशिष शेलार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत शिक्षणमंत्र्यांनी शिक्षकांनी मुंबई बाहेर समायोजनाची सक्ती करू नये, जेथे सहज जाणे शक्य आहे अशा ठिकाणीच समायोजन करावे. पालघर व रायगड ठाणे येथे अति दुर्गम भागात मुंबईतून पाठविलेल्या शिक्षकांना परत येण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्याचे निर्देश शिक्षकांना दिले. त्याचप्रमाणे मुंबई विभागात रिक्त जागा व वाढीव पदे यांची संख्याखूप कमी आहेत. त्यामुळे सर्वांचे समायोजन लगेचच होणार नाहीत, परंतु जशी जशी पदे रिक्त होतील तसे रिक्त जागांवर समायोजन होईल. परंतु कोणाचाही पगार बंद होणार नाही अशी सूचना सर्व अधिकार्‍यांना केली आहे. तसेच जेथे कायमस्वरूपी समायोजन करता येणार नाही, तेथे तात्पुरते पाठवले जाईल.पण वेतन मूळ शाळेतून काढण्यात यावे असेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -