घरमुंबईआयडॉलच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशास सुरुवात

आयडॉलच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशास सुरुवात

Subscribe

विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशास ८ सप्टेंबरपासून सुरुवात झाली. २३ सप्टेंबर २०२० पर्यंत हे प्रवेश सुरु राहतील.

मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या (आयडॉल) शैक्षणिक वर्ष २०२०-२१ च्या विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशास ८ सप्टेंबरपासून सुरुवात झाली. २३ सप्टेंबर २०२० पर्यंत हे प्रवेश सुरु राहतील. हे प्रवेश ऑनलाईन असतील.

२०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी पदवीस्तरावरील द्वितीय व तृतीय वर्ष बीए, बीकॉम, बीएस्सी आयटी व बीएस्सी कॉम्पुटर सायन्स या अभ्यासक्रमासाठी व पदव्युत्तर भाग २ एमए, एमए – शिक्षणशास्त्र, एमकॉम, एमएससी (गणित, आयटी व कॉम्पुटर सायन्स) व एमसीए (द्वितीय व तृतीय वर्ष) आणि पदव्युत्तर एक वर्षाचे व्यवस्थापन पदविका पीजी डीएफएम व पीजी डीओआरएम या अभ्यासक्रमाचे ऑनलाईन प्रवेश ८ सप्टेंबरपासून सुरु करण्यात आले आहेत. प्रथम वर्ष बीए, बीकॉम, बीएस्सी आयटी व भाग १ एमए, एमए – शिक्षणशास्त्र, एमकॉम, एमएससी (गणित व आयटी) व एमसीए प्रथम वर्ष या अभ्यासक्रमाचे प्रवेश युजीसी-डीईबीने प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर करण्यात येतील.

- Advertisement -

मागील वर्षी आयडॉलमध्ये ६७,२३७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. यामध्ये २६,१७१ विद्यार्थी होते, तर ४१,०६६ विद्यार्थिनी होत्या. विद्यार्थ्यांपेक्षा विद्यार्थिनीची संख्या सर्वाधिक होती. विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी ठाणे, कल्याण व रत्नागिरी या विद्यापीठाच्या उपकेंद्रावर आयडॉलच्या विद्यार्थ्यांना अध्ययन साहित्याचे वितरण केले जाते. तसेच त्यांना मार्गदर्शनही केले जाते. आयडॉलच्या प्रवेशाची सर्व अद्ययावत माहिती विद्यापीठाचे संकेतस्थळ, आयडॉलचे फेसबुक पेज व ट्विटरवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. याव्यतिरिक्त विद्यार्थ्यांसाठी [email protected] हा ईमेल उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -