घरमुंबईपतंग उडवणार्‍यांसाठी एईएमएलचा अलर्ट

पतंग उडवणार्‍यांसाठी एईएमएलचा अलर्ट

Subscribe

मुंबई उपनगरात पथनाट्यांचे आयोजन

मुंबई उपनगरातील वीज ग्राहकांना मकर संक्रातीच्या सणाच्या निमित्ताने अदाणी मुंबई इलेक्ट्रिसिटी लिमिटेडने धोक्याचा एलर्ट जारी केला आहे. आपल्या ३० लाख वीज ग्राहकांना मकरसक्रांतीचा सण सुरक्षित जावा अशा शुभेच्छा देतानाच अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडने (एईएमएल) पतंग उडवणार्‍यांना उच्चदाबाच्या (हायटेन्शन) ओव्हर हेड वीज पारेषणतारां पासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे. ग्राहकांच्या जनजागृतीसाठी एईएमएलमार्फत पथनाट्यांचेही विविध ठिकाणी आयोजन करण्यात येणार आहे.

सुरक्षिततेचा मुद्दा ध्यानात घेऊन एईएमएलने हा इशारे वजा सल्ला जारी केला आहे. ओव्हर हेड वीज पारेषणतारां जवळ पतंग उडवणे जीवासाठी धोकादायक तसेच मालमत्तेचे नुकसान करणारे आहे. पॉवर ग्रिडला हानी पोहोचून संपूर्ण शहर काळोखात जाण्याचा धोकाही आहे.

- Advertisement -

पतंग उडवण्यासाठी वापरल्या जाणार्‍या मांजात धातूची भुकटी वापरली असेल, तर तो खूपच धोकादायक होतो. या मांजाचा ओव्हर हेड वाहक तारांना नुसता स्पर्श झाला किंवा तो या तारांच्या वक्र कक्षेत जरी आला तरी तो अति उच्च म्हणजेच २२०००० व्होल्ट्स इतक्या विद्युत दाबाचे वहन करू शकतो.

मांजाच्या वापरामुळे शॉर्टसर्किट होऊन केवळ वीज पुरवठा खंडित होणार नाही, तर गंभीर दुखापती होणे, प्राणजाणे किंवा पारेषणतारांचे तुटून अगदी ग्रिड बंद होई पर्यंत गंभीर घटना होऊ शकतात, असे एईएमलचे प्रवक्ते म्हणाले. वर्सोवा, ओशिवरा, उत्तर उपनगरांचा पूर्वभाग म्हणजेच गोरेगाव, मालाड, कांदिवली आणि बोरिवली आदी उच्चदाब ओव्हरहेड पारेषणतारांचे जाळे आहे. म्हणूनच ओव्हर हेड वीज पारेषण तारांजवळ पतंग उडवणे टाळा, असे आवाहन कंपनीने केले आहे.

- Advertisement -

पारेषण तारांजवळ पतंग उडवल्याने काही अप्रिय घटना झाल्याचे लक्षात आल्यास किंवा कानावर आल्यास या भागांतील ग्राहकांनी किंवा नागरिकांनी तत्काळ१९१२२ या एईएमएलच्या डेडिकेटेड पॉवर हेल्पलाइन वर कळवावे, असे आवाहन एईएमएलने केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -