घरमुंबईतब्बल ७ वर्षानंतर रेल्वे पोलिसांनी प्रवाशाला चोरीचे पैसे केले परत

तब्बल ७ वर्षानंतर रेल्वे पोलिसांनी प्रवाशाला चोरीचे पैसे केले परत

Subscribe

मुंबई सेंट्रल पोलिसांनी तब्बल ७ वर्षांनंतर एका प्रवाशांचे रेल्वे स्थानकावर ८ हजार रुपये पळविणार्‍या आरोपीला अटक करुन त्यांचे चोरीचे पैसे परत केले आहेत.

रेल्वे स्थानकात बॅग किंवा पाकिट चोरीला गेले तर ते परत मिळेल याची कोणतीही शाश्वती नसते. पोलीस सुध्दा प्रयत्न करत नाही, असा ठप्पका नेहमीच रेल्वे पोलिसांवर प्रवाशांकडून ठेवला जातो. मात्र, मुंबई सेंट्रल पोलिसांनी तब्बल ७ वर्षांनंतर एका प्रवाशाचे रेल्वे स्थानकावर ८ हजार रुपये पळविणार्‍या आरोपीला अटक करुन त्यांचे पैसे परत केले आहे. मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांच्या या कामगिरीमुळे प्रवासी सुशिल कुमार यांनी पोलिसांचे आणि न्यायालयाचे आभार मानले आहेत.

नेमके काय घडले होते?

ऑक्टोबर २०१३ ला प्रवासी सुशील कुमार हे मुंबई ते दिल्लीचे रेल्वे तिकीट काढण्याकरिता मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात आले होते. ते तिकीट काढण्यासाठी रांगेत उभे होते. दरम्यान, एक अनोळखी व्यक्ती त्यांच्याकडे आली. त्यांनी झटपट तिकीट काढून देतो, असा आश्वास कुमार यांना दिला. त्यांच्या या आमिषाला कुमार बळी पडले. त्यांनी चक्क ८ हजार रुपये त्या अनोळखी व्यक्तीला दिले. मात्र, काही काळात तो आरोपी तेथून पसार झाला. तेव्हा कुमार यांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना तो रेल्वे तिकीट घराजवळ दिसलाच नाही. कुमार यांनी त्याची तक्रार मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांना दिली होती. पोलिसांनी याआरोपीचा शोध घेत, त्याला अटक केली. त्यानंतर न्यायलयात खटला सुरु झाला. या खटल्याचा निर्णय अखेर ७ वर्षांनी लागला. कोर्टाने निर्देश दिले की, ज्याची रक्कम घेऊन आरोपी पसार झाला होता. त्या प्रवाशाला ते पैसे परत द्यावेत. मुंबई सेंट्रल लोहमार्ग पोलिसांनी प्रवासी सुशील कुमार यांना संपर्क साधला आणि त्यांना तब्बल ७ वर्षानंतर हे पैसे परत करण्यात आले आहे, अशी माहिती मुंबई सेंट्रल लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक संभाजी कटारे यांनी  दैनिक ‘आपलं महानगर’ला दिली आहे.

- Advertisement -

पैसे मिळतील ही आशा सोडली होती

जेव्हा ही घटना घडली होती. तेव्हा मी यांची रितीसर तक्रार मुंबई लोहमार्ग पोलिसांकडे केली होती. मात्र, काही महिने उलटल्यानंतर मला पैसे मिळतील याची आशा सुध्दा सोडली होती. मात्र, पोलिसांनी मला बुधवारी कॉल केला. तुमचे पैसे मिळाले आहे. रेल्वे स्थांनकात येऊन घेऊन जा. तेव्हा मला यावर विश्वासच बसत नव्हता. ७ वर्षांनी माझे पैसे परत मिळत आहे.  मी लोहमार्ग पोलिसांचे मनापासून आभार मानतोय, अशी माहिती सुशील कुमार यांनी दैनिक ‘आपलं महानगर’शी बोलताना दिली आहे.


हेही वाचा – बनावट स्टॅम्पचा वापर करून दुकान खरेदीत घोटाळा

- Advertisement -

 

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -