घरमुंबईगाड्यांचे बोनेट कि सापांचे पिटारे, गाड्यांचे डॅशबोर्ड, इंजिनात साप

गाड्यांचे बोनेट कि सापांचे पिटारे, गाड्यांचे डॅशबोर्ड, इंजिनात साप

Subscribe

शहरातील ठिकठिकाणी साप निघत आहेत. पुरानंतर नादुरुस्त झालेली वाहने दुरुस्तीसाठी गॅरेजमध्ये आणली जात आहेत.

वसई तालुक्यात जोरदार पावसानंतर पाणीच पाणी झाले होते. शहरातील डोंगर, वनभाग, मोकळ्या जागा, मैदाने अडगळीची ठिकाणीही पाण्याखाली गेल्याने अशा ठिकाणी असलेले सापही बाहेर आले आहेत. शहरातील ठिकठिकाणी साप निघत आहेत. पुरानंतर नादुरुस्त झालेली वाहने दुरुस्तीसाठी गॅरेजमध्ये आणली जात आहेत. या वाहनांमध्येही सापांनी पुरात आश्रय घेतल्याने गॅरेजमध्ये बोनेट उघडल्यावर सर्पदर्शन होत आहे.

तालुक्यातील पाणी हळूहळूओसरु लागल्यामुळे दुचाकी,चारचाकी दुरुस्तीसाठी गॅरेजमध्ये जाऊ लागल्या आहेत. या गाड्यांची दुरुस्ती करतानाधक्कादायक प्रकार उघडकिस येत आहेत.नायगांव पश्चिमेकडील एक दुचाकीस्वार शनिवारी आपली गाडी घेवून निघाला होता.त्यावेळी गाडीच्या डॅशबोर्डमधून कसलातरी विचित्र आवाज येत असल्यामुळे त्याने गाडी थांबवली.त्यावेळी डॅशबोर्ड मधून एका सापाचे मुंडके डोकावत असताना त्याला दिसून आले.त्यानंतर सर्पमित्र विशाल ठाकुर याच्या मदतीने नागाला सुखरुप बाहेर काढण्यात आले.

- Advertisement -

दुसर्‍या एका घटनेत नालासोपारा पुर्वेकडील एका गॅरेजमध्ये अ‍ॅक्टीवा गाडी दुरुस्तीसाठी घेण्यात आली.त्यावेळी तीच्या इंजिनमध्ये साप असल्याचे दिसून आले.अग्निशमन दलाच्या मदतीने या सापाला बाहेर काढण्यात आले. वसईच्या जंगलपट्टीतील मांडवीच्या कंपनीत शिरणार्‍या दसफुटी अजगराला सर्पमित्र विनोद पाटील यांच्या सहाय्याने पकडण्यात आले. तर वसईच्या रहिवाशी संकुलात शिरणार्‍या अजगराला वनविभागाने पकडून जंगलात सोडले.

विरार पुर्वेकडील अनेक चाळींच्या मध्ये पाण्याच्या प्रवाहाबरोबरच सापही शिरले होते. मात्र,दिवड जातीचे हे बिनविषारी साप असल्याचे समजल्यावर त्यांना नागिराकांनीच पिटाळून लावले. वसईतील काही इमारतींच्या मागील झाडीत साप आणि ड्रेनजच्या टाक्यांवरही साप वेटोळे मारून असल्याचे दिसून आले. त्यामुळे वसईकर भयभित झाले आहेत. मात्र,या सापांमुळे कोणालाही अपाय झाला नसल्यामुळे त्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -