घरमुंबईकल्याण पाठोपाठ आत्ता डोंबिवलीकरांची ही पूल कोंडी

कल्याण पाठोपाठ आत्ता डोंबिवलीकरांची ही पूल कोंडी

Subscribe

डोंबिवली पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा कोपर उड्डाणपूल आज अखेर सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला. पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. रेल्वे मार्गावरून जाणारा हा पूल धोकादायक बनल्याचं काही महिन्यांपूर्वी समोर आल्यानंतर सुरुवातीला अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र त्यानंतर एखादा अपघात घडला, तर मोठं नुकसान होण्याच्या भीतीने आज हा पूल पूर्ण बंद करण्यात आला. यानंतर डोंबिवली पूर्व पश्चिमेची संपूर्ण वाहतूक ठाकुर्लीच्या उड्डाणपुलावरून वळवण्यात आली आहे.

मात्र हा पूल अरुंद असल्यानं वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. कल्याण च्या पत्रीपूल बंद केल्याने कल्याण करांना ट्राफिक चा त्रास सहन कराव लागत आत्ता हीच परिस्थिती डोंबिवली करांना मनस्थाप सहन कराव लागणार आहे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -