Friday, September 18, 2020
27 C
Mumbai
Advertisement

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत नंतर तिच्या आईने देखील शिवसेनेवर टीका केली आहे. शिवसेना भेकड अन् घाबरट आहे असं म्हणत कंगनाच्या आईने शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी कंगनाच्या जीवाला धोका असल्याचा दावा देखील केला आहे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी शिवसेनेवर टीका केली.

संपूर्ण भारत माझ्या मुलीसोबत असताना मुंबईत असा अन्याय का? ही बाळासाहेब ठाकरे यांची सेना नसून भेकड, भ्याड आणि घाबरट शिवसेना आहे. आम्ही त्यांच्यासारखे वंशवादी नाही. कंगनाने गेली १५ वर्षे कष्टानं पैसे कमावले आहेत. हे कसलं सरकार आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे आभार. माझ्या मुलाली सहकार्य केलं नसतं तर माझ्या मुलीचं समर्थन कोणी केलं असतं? असं कंगनाची आई म्हणाली.

कंगनाने मुंबईची पाकव्याप्त काश्मीर आणि तालिबानशी तुलना केल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी चोख प्रत्युत्तर दिलं. यानंतर कंगनाने शिवसेनेला मुंबईला येतेय, काय उखडायचं आहे ते उखडा असं खुलं आव्हान दिलं होतं. या सगळ्या घडामोडीत मुंबई मनपाने कंगनाच्या कार्यालयाला आणि घराला अनधिकृत बांधकाम प्रकरणी नोटीस बजावत २४ तासांत उत्तर देण्यास सांगिलं. मात्र, उत्तर न दिल्याने कंगनाच्या कार्यालयावर तोडक कारवाई केली. यावेळी कंगनाने शिवसेनेला आणि पालिका कर्मचाऱ्यांना बाबरची उपमा दिली. तर महाराष्ट्राला, मुंबईला पाकिस्तान म्हटलं. शिवाय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत अवमान केला आणि उद्या तुझं गर्वहरण होईल, असं व्हिडीओ शेअर करत म्हटलं. कंगना एवढ्यावरच न थांबता मुख्यमंत्र्यांनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांर निशाणा साधला. मात्र, शरद पवारांनी गांभीर्याने न घेता उपहासात्मक टोला लगावत दुर्लक्ष केलं.