Friday, August 7, 2020
Mumbai
27.8 C
घर ताज्या घडामोडी धक्कादायक! भाडे नाकारणाऱ्या टॅक्सी चालकावर कॉन्स्टेबलने केला अत्याचार

धक्कादायक! भाडे नाकारणाऱ्या टॅक्सी चालकावर कॉन्स्टेबलने केला अत्याचार

भाडे नाकारणाऱ्या एका टॅक्सी चालकावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी आरोपी आरपीएफ कॉन्स्टेबला अटक करण्यात आली आहे.

Mumbai
after refusing ride rpf constable allegedly raped taxi driver in CST

भाडे नाकारल्यामुळे एका टॅक्सी चालकावर रेल्वे सुरक्षा कॉन्स्टेबलने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना छत्रपती शिवाजी टर्मिनस जवळ घडल्याची माहिती समोर आली आहे. ग्रॅण्ट रोड येथील वेश्यावस्तीत जाण्यासाठी आरपीएफ कॉन्स्टेबलने टॅक्सी चालकाला विचारणा केली. पण, त्याने नकार दिल्यामुळे आरोपी कॉन्स्टेबलने टॅक्सीचालकाला बेदम मारहाण केली. त्यानंतर त्या कॉन्स्टेबलने त्या टॅक्सी चालकाला रेल्वेच्या हद्दीतील निर्जनस्थळी नेऊन त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी आरपीएफ कॉन्स्टेबल अमित धांकड याला अटक करण्यात आली आहे.

नेमके काय घडले?

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी संध्याकाळच्या सुमारास पीडित टॅक्सी छत्रपती शिवाजी टर्मिनस जवळ डिमेलो रस्त्यावर बेंचवर आराम करत होता. त्यावेळी आरोपी कॉन्स्टेबल अमित धांकड तेथे आला आणि त्याने टॅक्सी ग्रॅण्ट रोड इथल्या वेश्यावस्तीत नेण्यास विचारले. मात्र, त्याठिकाणी जाण्यास टॅक्सी चालकाने नकार दिला. याच गोष्टीचा राग मनात ठेऊन आरोपी अमित यांने पीडित टॅक्सी चालकाला रेल्वेच्या हद्दीतील एका निर्जनस्थळी नेऊन त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. तसेच टॅक्सी चालकाकडचे पैसे आणि टॅक्सीची चावी देखील हिसकावून घेतली. या घटनेनंतर पीडित टॅक्सी चालकाने पोलीस ठाण्यात धाव घेत कॉन्स्टेबल अमित धांकड विरोधात तक्रार केली असून या घटनेची माता रमाबाई आंबेडकर नगर पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली आहे.


हेही वाचा – वाडिया रुग्णालयाचे भवितव्य ठरणार; मुख्यमंत्री घेणार महत्त्वपूर्ण बैठक