घरताज्या घडामोडीठाकरे सरकारं आलं; तब्बल ७ वर्षांच्या अनवाणी प्रवासानंतर राजुल पटेल व्रत सोडणार

ठाकरे सरकारं आलं; तब्बल ७ वर्षांच्या अनवाणी प्रवासानंतर राजुल पटेल व्रत सोडणार

Subscribe

शिवसेनेचे सरकार राज्यात येईपर्यंत पायात चप्पल घालणार नाही, अशी प्रतिज्ञा घेणार्‍या शिवसेनेच्या विभाग संघटक आणि नगरसेविका राजुल पटेल अखेर सात वर्षांनंतर पायात चप्पल घालणार आहेत. बाळासाहेबांच्या निधनानंतर आपण घेतलेल्या शपथेचे पालन करत अनवाणी प्रवास करणार्‍या राजुल पटेल यांनी आता ठाकरे सरकार विराजमान झाल्यानंतर पायात चप्पल घालण्याचा निर्णय घेतला आहे. साडेतीन शक्तीपीठांना ५१ महिलांच्या हस्ते ओटी भरल्यानंतर पटेल या चप्पल घालण्याचे व्रत सोडणार आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे २७ नोव्हेंबर २०१२ मध्ये निधन झाले. परंतु बाळासाहेबांच्या अंत्ययात्रेतच अंधेरीतील शिवसेना विभाग संघटक राजुल पटेल यांनी जोवर शिवसेनेचे सरकार सत्तेवर येणार नाही, तोवर पायात चप्पल घालणार नाही. शिवसेनेचे सरकार बनून आपला मुख्यमंत्री बनेल तेव्हाच ५१ महिलांच्या हस्ते साडेतीन शक्तीपीठांना भेटी देत ओटी भरल्यानंतरच पायात चप्पल घालेन, असे व्रत त्यांनी घेतले होते. यामुळे मागील सात वर्षांपासून राजुल पटेल या अनवणाी प्रवास करत आहेत. त्यांनी ही शपथ घेतल्यानंतर कधीही पायात चप्पल घातले नाही.

- Advertisement -

राजुल पटेल यांनी अनवाणी फिरत जनसेवेचे काम केले. तसेच पक्षांच्या आंदोलनापासून प्रत्येक कामांमध्ये त्या अनवाणी फिरत आपल्या शपथेची आठवण मतदारांना तसेच कार्यकर्त्यांना करून देत होत्या. २०१४ मध्ये भाजप-शिवसेना युतीचे सरकार आले असले तरी ते शिवसेनेचे नव्हते. त्यामुळे त्यांनी आपले व्रत पुढे कायम ठेवले. परंतु त्यांचे ते स्वप्न साकार होण्यास नोव्हेंबर २०१९ उजाडावे लागले. राज्यात युतीचे सरकार जावून शिवसेनेच्या मदतीने महाविकास आघाडीचे सरकार आले आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे राजुल पटेल यांचे स्पप्न साकार झाले आणि घेतलेले व्रत सोडण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.

राज्यात शिवसेनेचे सरकार आल्यानंतर आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनल्यानंतर, आपले हे व्रत सोडण्यासाठी ५१ शिवसेना महिला पदाधिकार्‍यांना सोबत घेवून त्या सप्तश्रृंगी देवी, रेणुका देवी तसेच कोल्हापूर महालक्ष्मी आणि तुळजापूरला तुळजाभवानी देवीच्या दर्शनाला येत्या २० डिसेंबरनंतर निघणार आहेत. या ५१ महिलांच्या हस्ते देवींच्या ओठी भरल्यानंतर, मुंबईत येवून त्या पायी चप्पल घालण्याचे व्रत सोडणार आहेत.

- Advertisement -

‘बाळासाहेबांच्या निधनानंतरच निघालेल्या अंत्ययात्रेदरम्यानच ही शपथ मी घेतली आणि तिथेच चप्पल घालणे सोडून दिले होते. तेव्हापासून देवीचा व्रत म्हणून मी अनवाणी फिरत होते. पण राज्यात शिवसेनेचे सरकार येवून उद्धव साहेब मुख्यमंत्री झाल्यामुळे आता विभागातील ५१ महिला पदाधिकार्‍यांना साडेतीन शक्तीपीठांचे दर्शन घेण्यासाठी निघणार आहोत. येत्या २० तारखेनंतर यासर्व देवींचे दर्शनाला आम्ही निघणार आहोत. यासर्व देवींना ५१ महिलांच्या हस्ते ओटी भरल्यानंतर मी पायात चप्पल घालेन’, असे राजुल पटेल यांनी सांगितले.

यापूर्वी वरळीतील शिवसेनेचे पदाधिकारी आणि विद्यमान महापालिका नामनिर्देशित नगरसेवक अरविंद भोसले यांनी जोवर माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा पराभव होत नाही, तोवर आपण पायी चप्पल घालणार नाही, अशी प्रतिज्ञा केली घेतली होती. परंतु २०१४ च्या निवडणुकीत कुडाळ विधानसभा मतदार संघातून नारायण राणे यांचा पराभव शिवसेनेचे वैभव नाईक यांनी केला. त्यानंतर अरविंद भोसले यांनी कोकणातीलच आरवलीतील वेतोबाच्या दर्शनानंतर रेडी येथे जात पायी चप्पल घातले होते. त्यामुळे भोसले यांच्या नंतर आता राजुल पटेल यांचेही स्वप्न साकार झाल्याने त्याही तब्बल सात वर्षांनी पायी चप्पल घालणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -