घरमुंबईउल्हासनगरमध्ये स्वाइन फ्लूमुळे वयोवृद्ध नागरिकाचा मृत्यू

उल्हासनगरमध्ये स्वाइन फ्लूमुळे वयोवृद्ध नागरिकाचा मृत्यू

Subscribe

एका आठवड्यापासून स्वाइन फ्लू झाल्याने ठाणे घोडबंदर रोडवरील खाजगी रुग्णालयात उपचार घेणारे उल्हासनगरातील संपत राऊत या ७० वर्षीय नागरिकाचा अखेर मृत्यु झाला आहे. संपत राऊत हे कॅम्प नंबर ४ मधील कुर्ला कॅम्प परिसरात राहत होते. आठवड्यापूर्वी त्यांना स्थानिक खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र स्वाइन फ्लू झाल्याचे निदान डॉक्टरांनी दिल्यावर राऊत यांना घोडबंदर येथे उपचारासाठी नेण्यात आले होते. तिथे राऊत यांनी अखेरचा श्वास घेतला.

या वृत्ताला पालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राजा रिजवानी यांनी दुजोरा दिला आहे. डॉक्टरने स्वाईन फ्लू झाल्याचे म्हटले आहे. मात्र अहवाल अद्याप आला नसून तो आल्यावर मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार असे रिजवानी यांनी सांगितले. राऊत यांच्या नातलगां सोबत शेजारील नागरिकांना स्वाइन फ्लू होऊ नये याची दक्षता घेण्यासाठी त्यांना औषध देण्यात आल्याची माहिती देखील डॉ. रिजवानी यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -