घरमुंबईदेशातील ३.७ लाख कंत्राटी शिक्षकांना कोर्टाचा दणका

देशातील ३.७ लाख कंत्राटी शिक्षकांना कोर्टाचा दणका

Subscribe

लाठीमारानंतर शिक्षक आक्रमक

देशभरातील तब्बल ३.७ लाख कंत्राटी शिक्षकांना सुप्रीम कोर्टाने दणका दिला आहे. कंत्राटी शिक्षकांनी समान काम आणि समान वेतनासाठी सुप्रीम कोर्टात दाखल केलेली याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे देशभरातील ३.७ कंत्राटी शिक्षकांवर त्याचा परिणाम होणार आहे. सुप्रीम कोर्टाने कंत्राटी शिक्षकांना इतर शिक्षकांप्रमाणे वेतन देण्याचा आदेश १० मे रोजी झालेल्या सुनावणीत फेटाळून लावला होता. त्यावेळी सुप्रीम कोर्टाने बिहार सरकारने दाखल केलेली याचिका मंजूर केली होती. तसेच पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश रद्द केला होता. त्यानंतर कंत्राटी शिक्षकांनी सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली होती.

लाठीमारानंतर शिक्षक आक्रमक

आपल्या विविध मागण्यांसाठी मुंबईत आंदोलनाला बसलेल्या राज्यातील शिक्षकांवर झालेल्या लाठीमारानंतर मंगळवारी पुन्हा एकदा शिक्षकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे चित्र आझाद मैदानात दिसून आले. आझाद मैदानात शिक्षक संघटनांच्या भेटीसाठी गेलेल्या आमदार नागो गाणार यांना देखील या शिक्षक आक्रमकतेचा सामना करावा लागला. शिक्षकांनी गाणार यांनी घेराव घातल्याने याठिकाणी तणाव निर्माण झाला होता. तर इतर काही शिक्षक आमदारांनी थेट विधान भवनातच उपोषणाला सुरूवात केली. मात्र मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले. दरम्यान, शिक्षकांना झालेल्या मारहाणीचे मुंबईसह राज्यात पडसाद उमटल्याचे पहायला मिळाले असून राज्यभरातील अनेक शाळांमध्ये शिक्षकांनी मंगळवारी काळ्या फिती लावून आपले काम पूर्ण केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -