घरमुंबईकृषीपंप वीज वापराचा अहवाल फुगवलेला - प्रताप होगाडे

कृषीपंप वीज वापराचा अहवाल फुगवलेला – प्रताप होगाडे

Subscribe

महावितरणच्या भ्रष्टाचाराला संरक्षण देणारा अहवाल

महावितरणच्या अनावश्यक औदार्य दाखवणारा, चुकीचा आणि महावितरणच्या भ्रष्टाचाराला संरक्षण देणार असा कृषीपंप वीज वापराचा अहवाल समोर आला आहे. हा अहवाल म्हणजे शेतकर्‍यांना खोट ठरवायचा तसेच बदनाम करण्याचा धंदा असल्याची टीका महाराष्ट्र राज्य वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी केली आहे. या अहवालाविरोधातील लढाई कायम ठेवणार असल्याचे जाहीर केले आहे. येत्या दिवसात ऊर्जा मंत्र्यांकडेही हा विषय मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कृषीपंपाच्या वीज वापराची पडताळणी करण्यासाठी मुळात आयआयटी मुंबईचा अहवाल संदर्भासाठी घेणे आवश्यक होते. पण त्याचाही वापर या अभ्यासगटामार्फत करण्यात आला नाही. राज्य वीज नियामक आयोगाने याआधी जाहीर केलेल्या कृषीपंपाच्या वीज वापरापेक्षा जास्त तास समितीच्या अभ्यासातून फुगवून मांडण्यात आले आहेत. हे म्हणजे महावितरणच्या अकार्यक्षमतेला पाठीशी घालण्याचा प्रकार असल्याचे होगाडे म्हणाले. अहवालासाठी नेमण्यात आलेल्या समितीने महाराष्ट्र राज्य वीज ग्राहक संघटनेने दिलेल्या सूचना आणि माहितीचाही समावेश अहवालात करण्यात आलेला नाही असे होगाडे यांचे म्हणणे आहे. कृषीपंपाच्या वीज वापराबाबतच्या तक्रारी याआधीच्या मुख्यमंत्र्यांसमोर आम्ही संघटना म्हणून मांडल्या होत्या. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच तत्कालीन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही शेतकर्‍यांच्या वीज वापराची आकडेवारी जास्त दाखवण्यात आल्याचे मान्य केले होते.

- Advertisement -

आम्ही संघटनेच्या माध्यमातून तब्बल ५ हजार लोकांचे अर्ज दाखल केले होते. तसेच माहितीच्या अधिकारातूनही हा डेटा सादर करण्यात आला होता. १ फ्रेब्रुवारीपासून फीडर इनपुटवर आधारीत कृषीपंप ग्राहकांची वीज वापराची आकडेवारी वापरण्यात यावी. त्यामुळे फीडर इनपुट वाद होऊ शकत नाही. किंवा गेल्या वर्षभऱातील फीडर इनपुटची आकडेवारी घेऊन बिलिंग तपासावे. ही आकडेवारी १ हजार तासांपेक्षा जास्त येणार नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. राज्यात महावितरणमार्फत दिले जाणारे ५० टक्के कृषीपंपाची विजेचे बिले चुकीची आकारले जात असल्याची माहिती एका अहवालाच्या माध्यमातून समोर आले आहे.राज्यातील कृषीपंपाचा वीज वापराच्या विश्लेषणात्मक अभ्यासासाठी अखेर अभ्यासगटाने आपला अहवाल दाखल केला आहे. या अभ्यासगटामध्ये डॉ शशांक भिडे (निवृत्त अधिकारी, एनसीएआरई), पी एच भागूरकर (अर्थशास्त्र आणि सांख्यिकी विभाग) हे सल्लागार म्हणून उपस्थित होते. कृषीपंपासाठी होणार्‍या वीज वापराबाबत अभ्यास गटाच्या अंतिम अहवालावर लेखी अभिप्राय किंवा सूचना, हरकती मागविण्यात आल्या आहेत. सचिव, महाराष्ट्र वीज नियामक आयोग यांच्याकडे या सूचना १७ फेब्रुवारीपर्यंत पाठविण्यात येणे अपेक्षित आहे.

त्रयस्त अभ्यासगटाच्या अहवालातील निष्कर्ष

राज्य वीज नियामक आयोगाने महावितरणच्या कृषीपंप वीज वापरासाठी त्रयस्थ समितीची नेमणुक केली होती. या समितीने महावितरणच्या ५०२ विजेच्या फीडर्सवर एकुण दीड लाख कृषीपंप वीज ग्राहकांचे सर्वेक्षण केले. महावितरणच्या सध्याच्या यंत्रणेतील २८ परिमंडळाचे सर्वेक्षण या अभ्यासाच्या निमित्ताने करण्यात आले. महावितरणच्या ४२ लाख वीज ग्राहकांपैकी ३ टक्के वीज ग्राहकांचा अभ्यास सर्वेक्षणाच्या निमित्ताने करण्यात आला. सध्या महावितरणच्या यंत्रणेत फक्त ३० टक्के मीटर असलेले ग्राहक आहेत असे सध्याच्या सर्वेक्षणातून आढळून आले आहे. मीटर असणार्‍या ग्राहकांना देण्यात येणार्‍या विजबिलांमध्ये ५० टक्के मीटर रिडिंग या चुकीच्या आढळल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -