पाहा : अजिंक्य रहाणेच्या दोन दिवसांच्या चिमुकलीचे फोटो!

सामना संपताच अजिंक्यने पत्नी आणि मुलीची भेट घेतली. यावेळीचे काही छायाचित्रं त्याने आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

Mumbai
ajinkya rahane became father

नुकताच भारताने दक्षिण आफ्रिकेच्या संघाला २०३ धावांनी पराभूत करत कसोटी सामना जिंकला. हा सामना सुरु असताना भारताच्या कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याला कन्यारत्नप्राप्ती झाली. अजिंक्यची पत्नी राधिकाने शनिवारी गोंडस मुलीला जन्म दिला. ही बातमी कळताच अजिंक्यच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर रहाणे पती-पत्नीचे अभिनंदन केले. सामना संपताच अजिंक्यने पत्नी आणि मुलीची भेट घेतली. यावेळीचे काही छायाचित्रं त्याने आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

आपल्या मुलीसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करताना त्याने फोटोखाली ‘हॅलो’ असे कॅप्शन दिले आहे. अजिंक्यची पत्नी राधिकानेसुद्धा तोच फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. फोटोमध्ये अजिंक्य पत्नी राधिका आपल्या नवजात मुलीबरोबर आनंदित दिसत आहे. आई-बाबा झाल्याचा आनंद दोघांच्याही चेहऱ्यावर ओसंडून वाहत आहे.

View this post on Instagram

Our bundle of joy is here 🥰

A post shared by Radhika Rahane (@radhika_dhopavkar) on

आपल्या पत्नी आणि मुलीची भेट घेतल्यानंतर अजिंक्य पुन्हा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात खेळणार आहे. १० ऑक्टोबर पासून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांमध्ये दुसरा कसोटी सामना पुण्यात खेळला जाणार आहे. या सामन्याआधी अजिंक्य पुन्हा भारतीय संघात सामील होणार आहे.