घरमुंबईमुंबई पालिका निवडणुकीसाठी आघाडी व्हावी, अजित पवारांची इच्छा!

मुंबई पालिका निवडणुकीसाठी आघाडी व्हावी, अजित पवारांची इच्छा!

Subscribe

पुढील वर्षी अर्थात २०२२च्या फेब्रुवारी महिन्यात होऊ घातलेली मुंबई महापालिकेची निवडणूक शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र लढावी, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी येथे व्यक्त केले. या संदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि मुंबई विभागीय अध्यक्ष भाई जगताप यांच्याशी चर्चा करणार असल्याचंही अजित पवार यांनी सांगितलं. फेब्रुवारी २०२२ मध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक अपेक्षित आहे. या निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी काँग्रेस मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढेल, असे जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर आज पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी पक्षाची भूमिका मांडली.

‘..तर ना तुला, ना मला असं होईल’

‘राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका मित्रपक्षांबरोबर आघाडी करून पुढे जायचे अशी आहे. मात्र, याबाबत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार पवार साहेबांना आहे’, असे अजित पवार म्हणाले. ‘निवडणुकीत आघाडी करावी, मतांची विभागणी होऊ नये या मताचा मी आहे. परंतु, आघाडी न केल्यास ना तुला ना मला ना असे होऊ शकते. त्यामुळे आघाडीबाबत मी सकारात्मक आहे. आम्ही याबाबत बाळासाहेब थोरात आणि भाई जगताप यांच्याशी चर्चा करू. महाविकास आघाडीला कुठे अडचण न येता स्थानिक स्वराज्य संस्थेत यश मिळावे असा आमचा प्रयत्न असेल’, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

विधानपरिषद निवडणुकीत गडबड झाल्याच्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आरोपाबाबत बोलताना पवार यांनी ‘आरोपांची चौकशी करण्याचे आव्हान दिले. चौकशीबाबत आमचे काहीही म्हणणे नाही. पराभव झाला की अशा गोष्टी पुढे आणल्या जातात. लोकसभा निवडणुकीचा निकाल आला तेव्हाही यात निकाल मॅनेज केला असे बोलले गेले. पण असे होत नाही’, असे अजित पवार म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -