मुख्यमंत्री परीस तर गिरीश महाजन… – ऐका अजित पवारांचे तुफान भाषण

मुख्यमंत्री परिस आहेत. या परिस स्पर्शामुळे गिरीश महाजन यांचे सोने झाले असल्याची टिप्पणी अजित पवार यांनी केली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांसहीत सर्वच सत्ताधारी आमदारांनी त्याला हसून दाद दिली.

Mumbai
devendra fadnavis and ajit pawar
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार

अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात आज विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांची घोषणा करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या अभिनंदनपर केलेल्या भाषणात अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना चांगल्याच कोपरखळ्या मारल्या. विरोधी पक्षनेतेपदी एकनाथ खडसे यांनी चांगले काम केले होते. पण सरकार आल्यानंतर फक्त एक वर्ष त्यांच्याकडे मंत्रीपद होते. त्यानंतर क्षुल्लक चौकशीच्या कारणास्तव त्यांना डावलण्यात आले. पुन्हा त्यांना मंत्रीपद देण्यात आले नाही. यातले वास्तव फक्त मुख्यमंत्री आणि त्यांनाच माहीत? अशी प्रतिक्रिया देत असताना अजित पवार यांनी गिरीश महाजन यांच्यावरही चांगलीच टिप्पणी केली.

विजय वडेट्टीवार यांची विधान सभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड

विजय वडेट्टीवार यांची विधान सभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने विधिमंडळ पक्षनेते आमदार Ajit Pawar यांनी अभिनंदन केले. विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेते म्हणून निवड व्हावी, अशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि सर्व विरोधी मित्रपक्षांची मागणी होती. आज आमची मागणी मान्य झाली, असे पवार म्हणाले. वडेट्टीवार यांना २०-२० मॅच खेळायची आहे. त्यांना कामकाजासाठी सहाच दिवसाचा कालावधी मिळत आहे. पण सत्ताधाऱ्यांपेक्षा विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी मोठी असते. त्यामुळे जनता विरोधी पक्षनेत्यांकडे अपेक्षेने पाहते, विरोधी पक्षनेता आक्रमक असायला हवा अशी जनतेची मागणी असते आणि विजय वडेट्टीवार जनतेची अपेक्षा पूर्ण करतील, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.#MansoonSession2019

Nationalist Congress Party – NCP ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಸೋಮವಾರ, ಜೂನ್ 24, 2019

गिरीश महाजन यांचे सोने झाले

अजित पवार एकनाथ खडसे यांच्यावर बोलत असताना गिरीश महाजन हे आता पुढे पुढे दिसत आहेत, असा शेरा काही आमदारांनी मारला. त्यानंतर अजित पवार म्हणाले की, गिरीश महाजन काहीच नाहीत. मुख्यमंत्री परिस आहेत. या परिस स्पर्शामुळे गिरीश महाजन यांचे सोने झाले. अजित पवार यांनी ही टिप्पणी केली तेव्हा गिरीश महाजन सभागृहात हजर नव्हते. मात्र मुख्यमंत्र्यांसहीत सर्वच सत्ताधारी आमदारांनी त्याला हसून दाद दिली. त्यामुळे खरंच गिरीश महाजनांचा उद्धार हा मुख्यमंत्र्यांच्या जवळीकीमुळे झाली की काय? असे चित्र दिसत होते.

वडेट्टीवारांनी २०-२० गेम खेळावा

विजय वडेट्टीवार यांना विरोधी पक्षनेते म्हणून फक्त ६ दिवसांचा कालावधी मिळाला आहे. त्यामुळे कसोटी आणि वन डे न खेळता त्यांनी कमी कालावधीत २०-२० गेम खेळावा, असे सांगितले. राजकारणात वरिष्ठ सांगितल ती जबाबदारी पार पाडावी लागते. कधीकधी नको त्या ठिकाणीही जाऊन बसावे लागते. विजय वडेट्टीवार यांनी चांगले काम करावे. काही लोक अधिवेशन संपल्यानंतर रथयात्रा की जत्रा काढणार आहेत. त्यांना तोडीस तोड उत्तर देण्यासाठी वडेट्टीवार यांनी देखील राज्यव्यापी दौरा करावा, असेही अजित पवार पुढे म्हणाले.